SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'या' दिवशी होणार मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा, MI ची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Mumbai Indians New Captain : मुंबई इंडियन्सने गुरुवारी संध्याकाळी एक पोस्ट शेअर केली असून त्याच्या माध्यमातून शुक्रवारी संघ एक मोठी घोषणा करणार असे समोर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून चाहते मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2027 सीजनचा नवा कर्णधार कोण असणार याच्या नावाच्या प्रतीक्षेत आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 18:29 IST | Updated: Nov 26, 2026, 19:11 IST
Image Credit: 'या' दिवशी होणार मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा, MI ची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Join

Mumbai Indians New Captain : मागील अनेक दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2027 साठी कर्णधार कोण असणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा मागील तीन सीजनचा कर्णधार हार्दिक पांड्या याला मुंबईने पंजाब किंग्सकडे ट्रेड केलं असून त्याबदल्यात गोलंदाज अर्शदीप सिंहला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची खुर्ची ही रिक्त आहे. मुंबई इंडियन्सने ज्याच्या नेतृत्वात आयपीएलच्या एकूण 5 ट्रॉफी जिंकल्या अशा रोहित शर्माच्या खांद्यावर फ्रेंचायझी पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात 27 नोव्हेंबर 2026 ही तारीख लिहिलेली आहे. त्यामुळे या तारखेला मुंबई इंडियन्स आगामी सीजनसाठी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते अशी चर्चा आहे. 

रोहित शर्मा असणार नवा कर्णधार?

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा इंडियन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं. मात्र आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेडद्वारे संघात आलेल्या हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवलं. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहितचे फॅन्स नाराज झाले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा मागील तीन वर्षांचा परफॉर्मन्स समाधानकारक नव्हता. संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या काही स्थानांवर राहत होता. त्यानंतर आयपीएल 2027 पूर्वी हार्दिक पांड्याला पंजाब किंग्समध्ये ट्रेड करण्यात आले आणि अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्समध्ये सामील करण्यात आले. ही संपूर्ण डील 18-18 कोटींना झाली.

मुंबई इंडियन्सचा ढासळता परफॉर्मन्स पाहून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची माळ ही रोहित शर्माच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 साठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह अशी नावं चर्चेत होती. मात्र मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नेतृत्वत म्हणून रोहित शर्मावर विश्वास ठेवण्याची चर्चा आहे. याआधी सुद्धा मुंबई इंडियन्सने एक फोटो शेअर करून नव्या कर्णधाराच्या नावाची उत्सुकतता वाढवली होती.  

हेही वाचा : सकाळी किती वाजता सुरु होणार IND VS NZ दुसरा टेस्ट सामना? कुठे पाहता येणार?
 

मुंबई इंडियन्स :

अर्शदीप सिंग, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर, नमन धीर, क्विंटन डी कॉक, रघु शर्मा, राज अंगद बावा, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, शार्दुल ठाकूर, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, विल जॅक्स.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES