• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मुंबई इंडियन्स IPL 2027 पूर्वी स्टार खेळाडूला केलं रिलीज, CSK शी होतं खास कनेक्शन

मुंबई इंडियन्स IPL 2027 पूर्वी स्टार खेळाडूला केलं रिलीज, CSK शी होतं खास कनेक्शन

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 पूर्वी त्यांच्या संघातील स्टार गोलंदाजाला रिलीज करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा गोलंदाज आता आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शनमध्ये सामील होईल.

Reported Bypooja pawar
Published: Nov 17, 2026, 15:37 IST|Updated: Nov 17, 2026, 16:06 IST
joinshare
मुंबई इंडियन्स IPL 2027 पूर्वी स्टार खेळाडूला केलं रिलीज, CSK शी होतं खास कनेक्शन
Image Credit: मुंबई इंडियन्स IPL 2027 पूर्वी स्टार खेळाडूला केलं रिलीज, CSK शी होतं खास कनेक्शन

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Mumbai Indians IPL 2027 Release List : इंडियन प्रीमियर लिगचा आगामी सीजन हा 20 वा सीजन असणार आहे. आयपीएल 2027 पूर्वी सर्व संघांना बीसीसीआयने त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची घोषणा करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे.  संध्याकाळी 5 वाजल्यापासून आयपीएल संघांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंच्या लिस्ट समोर येतील. मात्र त्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघातून एक मोठी माहिती समोर आलेली आहे. मुंबई इंडियन्स गोलंदाज दीपक चहर याला रिलीज करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपक चहरला स्वतःहून मुंबई इंडियन्स पासून वेगळं व्हायचं होतं, त्यामुळेच तो यंदा मुंबईच्या रिटेन लिस्टचा भाग असणार नाही. परिणामी दीपक चहर आता आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये दिसेल. 

मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी सर्व फ्रँचायझी आपापल्या संघात रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावे जाहीर करणार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेला मुंबई इंडियन्सचे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत की, मॅनेजमेंट यंदा कोणत्या खेळाडूंवर आपला विश्वास कायम ठेवते आणि कोणाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवते. दरम्यान दीपक चहरबाबत एक अपडेट समोर आली आहे. मुंबईने आपल्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळकट करण्यासाठी चहरला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याला आता रिलीज करण्यात आले आहे, याचा अर्थ तो ऑक्शनमध्ये सहभागी होईल. आयपीएलच्या मागील सीजनमध्ये  दीपकने केवळ 8 सामने खेळले आणि 8 विकेट्स घेतल्या होत्या. 


हेही वाचा : MS Dhoni ची आयपीएलमधून निवृत्ती! IPL 2027 पूर्वी CSK कडून मोठी जबाबदारी
 

कसा होता दीपकचा परफॉर्मन्स?

दीपक चहरला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतलं होतं. मात्र त्याचं प्रदर्शन काही खास राहिलं नाही. चहरची गोलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. दुखापतींमुळेही दिपकला मोठा फटका बसला आहे. शिवाय आयपीएलमधील त्याचा पगार खूप जास्त आहे. देशांतर्गत स्पर्धांमधील त्याची कामगिरीही फारशी प्रभावी राहिलेली नाही. आता मुंबईने अर्शदीप सिंगलाही संघात सामील केले असून, व्यवस्थापन त्याला 18 कोटी रुपये देणार आहे. त्याच्या येण्यामुळे संघाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. अर्शदीप हा टी20 क्रिकेटमधील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. कदाचित चहरच्या बाबतीत मुंबईने घेतलेल्या मोठ्या निर्णयामागे हे एक कारण असू शकते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Mumbai Indians
IPL
Marathi News