मुंबई इंडियन्स IPL 2027 पूर्वी स्टार खेळाडूला केलं रिलीज, CSK शी होतं खास कनेक्शन
मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 पूर्वी त्यांच्या संघातील स्टार गोलंदाजाला रिलीज करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा गोलंदाज आता आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शनमध्ये सामील होईल.
Mumbai Indians IPL 2027 Release List : इंडियन प्रीमियर लिगचा आगामी सीजन हा 20 वा सीजन असणार आहे. आयपीएल 2027 पूर्वी सर्व संघांना बीसीसीआयने त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची घोषणा करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून आयपीएल संघांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंच्या लिस्ट समोर येतील. मात्र त्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघातून एक मोठी माहिती समोर आलेली आहे. मुंबई इंडियन्स गोलंदाज दीपक चहर याला रिलीज करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपक चहरला स्वतःहून मुंबई इंडियन्स पासून वेगळं व्हायचं होतं, त्यामुळेच तो यंदा मुंबईच्या रिटेन लिस्टचा भाग असणार नाही. परिणामी दीपक चहर आता आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये दिसेल.
मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी सर्व फ्रँचायझी आपापल्या संघात रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावे जाहीर करणार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेला मुंबई इंडियन्सचे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत की, मॅनेजमेंट यंदा कोणत्या खेळाडूंवर आपला विश्वास कायम ठेवते आणि कोणाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवते. दरम्यान दीपक चहरबाबत एक अपडेट समोर आली आहे. मुंबईने आपल्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळकट करण्यासाठी चहरला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याला आता रिलीज करण्यात आले आहे, याचा अर्थ तो ऑक्शनमध्ये सहभागी होईल. आयपीएलच्या मागील सीजनमध्ये दीपकने केवळ 8 सामने खेळले आणि 8 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा : MS Dhoni ची आयपीएलमधून निवृत्ती! IPL 2027 पूर्वी CSK कडून मोठी जबाबदारी
कसा होता दीपकचा परफॉर्मन्स?
दीपक चहरला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतलं होतं. मात्र त्याचं प्रदर्शन काही खास राहिलं नाही. चहरची गोलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. दुखापतींमुळेही दिपकला मोठा फटका बसला आहे. शिवाय आयपीएलमधील त्याचा पगार खूप जास्त आहे. देशांतर्गत स्पर्धांमधील त्याची कामगिरीही फारशी प्रभावी राहिलेली नाही. आता मुंबईने अर्शदीप सिंगलाही संघात सामील केले असून, व्यवस्थापन त्याला 18 कोटी रुपये देणार आहे. त्याच्या येण्यामुळे संघाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. अर्शदीप हा टी20 क्रिकेटमधील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. कदाचित चहरच्या बाबतीत मुंबईने घेतलेल्या मोठ्या निर्णयामागे हे एक कारण असू शकते.