PCB Central Contract 2026-27 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2026 -27 मिळालेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात स्टार क्रिकेटर मोहम्मद रिझवानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून तो त्या 7 खेळाडूंमध्ये सामील होता ज्यांना याचवर्षी सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्या दरम्यान माध्यातूनच घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर ऑनलाईन बेटिंगच्या संशयावरून NCCIA (नॅशनल सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ने तपास आणि चौकशी केली होती.
तीन मोठ्या नावांना वगळलं :
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये सॅमी अयुबचं नाव देखील सामील आहे. तसेच स्टार क्रिकेटर शान मसूदचं सुद्धा नाव या लिस्टमधून गायब आहे. पीसीबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 38 पुरुष क्रिकेटपटूंसाठी नवीन केंद्रीय करार संरचना जाहीर केली आहे, जी 30 जून 2027 रोजी संपेल'.
बाबर आझम आणि सलमान अली आगा यांना टॉप कॅटेगरीमध्ये सामील करण्यात आलं आहे जे टेस्ट आणि वनडेसाठी आहे. पाकिस्तान बोर्डाने या लिस्टला 5 कॅटेगरीमध्ये विभागलं असून यातील पहिल्या कॅटेगरीमध्ये बाबर आणि सलमान आगा यांना टेस्ट आणि वनडे सामन्यांसाठी करार मिळाले आहेत. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टेस्ट सामन्यांसाठीचे करार आहेत, ज्यामध्ये 4 खेळाडूंचा समावेश आहे. वनडे आणि टी20 सामन्यांच्या कॅटेगरीमध्ये 6 खेळाडूंचा समावेश असून, त्यात फखर जमान, अबरार अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे.
चौथ्या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश आहे ज्यांना टी20 क्रिकेटसाठी करार मिळाले आहेत. या गटात हसन नवाझ, नसीम शाह आणि शादाब खान यांच्यासह एकूण 7 खेळाडू आहेत. याव्यतिरिक्त एक 'डेव्हलपमेंट' श्रेणीही आहे, ज्यामध्ये अब्दुल समदसह 19 खेळाडूंचा समावेश आहे.
कॉन्ट्रॅक्ट (टेस्ट आणि वनडे) :
बाबर आजम और सलमान अली आगा.
कॉन्ट्रॅक्ट (टेस्ट) :
अजान अवैस, मोहम्मद अब्बास, साजिद खान आणि सऊद शकील.
कॉन्ट्रॅक्ट (वनडेआणि टी20) :
अबरार अहमद, अराफात मिन्हास, फखर जमान, फहीम अशरफ, हारिस रऊफ आणि शाहीन शाह अफरीदी.
कॉन्ट्रॅक्ट (टी20) :
हसन नवाज, माज सदाकत, मोहम्मद सलमान मिर्जा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, शादाब खान आणि उस्मान तारिक.
कॉन्ट्रॅक्ट (डेव्हलपमेंट) :
अब्दुल समद, अब्दुल्ला फजल, अहमद दानियाल, अली रजा, फरहान यूसुफ, हुनैन शाह, मोहम्मद ताहा, मोहम्मद तैयब आरिफ, मुहम्मद गाजी गोरी, मुहम्मद इमरान रंधावा, रजाउल्लाह, साद बेग, साद मसूद, समीर मिन्हास, साकिब खान, शाहजेब खान, शमील हुसैन, सुफियान मोकीम आणि उबैद शाह.