SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार बनला इंडिया A चा उपकर्णधार

Rajat Patidar : 2 नोव्हेंबर रोजी पुरुष रायजिंग स्टार्स एशिया कपसाठी इंडिया ए संघाची घोषणा झाली असून यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्याकडे उपकर्णधार देण्यात आले आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 02, 2026, 07:58 PM IST | Updated: Nov 02, 2026, 08:43 PM IST
Image Credit: RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार बनला भारतीय संघाचा उपकर्णधार
Join

Rajat Patidar : पुरुष रायजिंग स्टार्स एशिया कपसाठी इंडिया ए संघाची घोषणा झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी संघाची घोषणा करण्यात आली असून कतारच्या दोहामध्ये 19 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत रजत पाटीदारवर सुद्धा विश्वास वर्तवण्यात आला आहे. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करतील याव्यतिरिक्त स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांचाही 15 सदस्यीय संघात समावेश असणार आहे.

रजत पाटीदार उपकर्णधार :

आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला लागोपाठ दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार रजत पाटीदारला पुरुष रायजिंग स्टार्स एशिया कपमध्ये इंडिया ए संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. 33 वर्षांच्या रजत पाटीदारने भारतासाठी तीन टेस्ट आणि एक वनडे सामना खेळला. आयपीएल 2026 मध्ये रजत पाटीदारने धावांचा डोंगर उभा केला. 15 सामन्यात 5 अर्धशतकांच्या मदतीने 501 धावा ठोकल्या.

रजतला त्याच्या या परफॉर्मन्सचं बक्षिस सुद्धा मिळालं आणि  'इंडिया ए' संघात त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्यात 'निळी जर्सी' परिधान करून मैदानातही पाऊल ठेवले होते. पाटीदारने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2024 मध्ये एक टेस्ट सामना खेळला, त्यानंतर मात्र तो वरिष्ठ संघातून बाहेर आहे.

हेही वाचा : 'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

भारत - पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये :

ग्रुप बी मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सोबत असून त्यांच्या ग्रुपमध्ये नेपाळ आणि यूएई यांचा सुद्धा समावेश आहे. ग्रुप ए मध्ये बांगलादेश ए, श्रीलंका ए, अफगाणिस्तान ए आणि हॉंगकॉंगच्या संघांचा समावेश होता. इंडिया ए चा पहिला सामना हा 20 नोव्हेंबर रोजी नेपाळ विरुद्ध खेळवला जाईल. पाकिस्तान ए विरुद्धचा दुसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी होईल, तर गट टप्प्यातील शेवटचा सामना 24 नोव्हेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळला जाईल. पहिला सेमी फायनल सामना 26 नोव्हेंबर रोजी आणि दुसरा सेमी फायनल सामना 27 नोव्हेंबर रोजी होणार असून अंतिम सामना 29 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES