SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी तयार नव्हतो.... अंबानी सोबत बोलणं झालं', मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर रोहित शर्माचा खुलासा

Rohit Sharma Captain Mumbai Indians : 7 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र रोहितने दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की तो सुरुवातीला संघाचं नेतृत्व करण्यासाठी तयारच नव्हता.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 28, 2026, 18:18 IST | Updated: Nov 28, 2026, 19:04 IST
Image Credit: 'मी तयार नव्हतो.... अंबानी सोबत बोलणं झालं', मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर रोहित शर्माचा खुलासा
Join

Rohit Sharma Captain Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आगामी आयपीएल 2027 साठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची घोषणा केली आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याकडे मुंबईने संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं आणि 5 ट्रॉफी जिंकावणाऱ्या कर्णधार रोहितकडून संघाचं नेतृत्व काढून घेतलं होतं. 27 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी रोहित शर्माच्या नावाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने सांगितलं की आकाश अंबानी यांची भेट घेतल्यावर त्याने पुन्हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याबाबत विचार केला. रोहित म्हणाला की सुरुवातीला तो यासाठी तयारच नव्हता. रोहितने याबाबत आपल्या पत्नीशी सुद्धा बातचीत केली. 

मुंबई इंडियन्सने या मुलाखतीत म्हटलं की, 'मी माझ्या पत्नीसोबत या विषयावर चर्चा करत होतो. आकाश अंबानींचा मला फोन आला. त्यानंतर आम्ही मिळून चर्चा केली की, संघाला पुढे नेण्यासाठी काय करता येईल. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली'.

सुरुवातीला नेतृत्व करण्यासाठी तयार नव्हता रोहित :

रोहित शर्माने पुढे मुलाखतीत म्हंटलं की, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, सुरुवातीला मला असे वाटले की मी पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्यास तयार नाही. मला मागे वळून त्या गोष्टींवर विचार करावा लागला. खूप काही घडले होते. ही जबाबदारी पेलण्यासाठी माझी मानसिक स्थिती योग्य आहे की नाही, याची मला खात्री नव्हती'.

संघाला पुढे नेण्याबाबतच्या चर्चेवर अधिक विचार करताना रोहितच्या लक्षात आले की, संघाला त्याची गरज आहे. कदाचित कर्णधार म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जी त्यांना योग्य दिशा दाखवू शकेल. रोहित म्हणाला की, 'मला एक जाणीव झाली. मी असे म्हणत नाहीये की या संघाला माझी कर्णधार म्हणून गरज आहे, पण उलट, या संघाला दिशा मिळण्याची गरज आहे'.

हेही वाचा : रोहित शर्माची कर्णधार म्हणून घोषणा करण्यासाठी मुंबई इंडियन्सने '27 नोव्हेंबर' हीच तारीख का निवडली?

 रोहित शर्मा खूप विचार केल्यावर मग मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्यासाठी तयार झाला. रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती आणि या पहिल्याच सीजनला त्याने संघाला चॅम्पियन बनवलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. रोहित म्हणाला, 'मला जाणीव झाली की हा तोच संघ आहे जो मी घडवला होता. मी 10 वर्षे या संघाचे नेतृत्व केले आहे. मला असे वाटले की, आता पुन्हा एकदा ते आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे'.
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES