SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 29 वा वनडे कर्णधार, यापूर्वी कोणी कोणी सांभाळलं संघाचं नेतृत्व?

Team India ODI Captains: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १३ नोव्हेंबर रोजी वनडे सीरिजमधील चौथा सामना खेळवला जाणार आहे. यात शुभमन गिल ऐवजी श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 29 वा वनडे कर्णधार असणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 12, 2026, 14:38 IST | Updated: Nov 12, 2026, 15:01 IST
Image Credit: श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 29 वा वनडे कर्णधार, यापूर्वी कोणी कोणी सांभाळलं संघाचं नेतृत्व?
Join

Team India ODI Captains: भारताचा नियमित वनडे कर्णधार शुभमन गिल हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेले तीन वनडे सामने खेळल्यावर आता आगामी काळात न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजच्या सरावाला लागला आहे. त्यामुळे शुभमन गिल हा न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारताच्या वनडे संघच नेतृत्व हे श्रेयस अय्यर करेल. श्रेयस अय्यर हा भारताचा टी२० संघाचा कर्णधार आहे. मात्र पहिल्यांदाच श्रेयस हा भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व करेल.  श्रेयस अय्यर अशा प्रकारे भारतीय पुरुष वनडे संघाचा 29 वा कर्णधार असणार आहे.

भारताच्या वनडे संघाचा पहिला कर्णधार कोण?

वनडे फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच अजित वाडेकरने भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व केलं होतं. टीम इंडियाने पहिला वनडे सामना हा जुलै महिन्यात 1974 मध्ये इंग्लंड विरुद्ध झाला होता. कर्णधार वाडेकर यांनी संघासाठी 67 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता. लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडने 4 विकेटराखून विजय मिळवला.

वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले खेळाडू :

अजीत वाडेकर

वेंकटराघवन

बिशन सिंह बेदी

सुनील गावस्कर

विश्वनाथ

कपिल

सैयद किरमानी

एम अमरनाथ

रवि शास्त्री

वेंगसरकर

श्रीकांत

मोहम्मद अजहरुद्दीन

सचिन तेंडुलकर

ए जडेजा

सौरव गांगुली

राहुल द्रविड़

अनिल कुंबळे

वीरेंद्र सहवाग

एमएस धोनी

सुरेश रैना

गौतम गंभीर

विराट कोहली

अजिंक्य रहाणे

रोहित शर्मा

शिखर धवन

केएल राहुल

हार्दिक पांड्या

शुभमन गिल

श्रेयस अय्यर

हेही वाचा : IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना 13 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुईमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडेल. सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज ही 2-0 अशा स्थितीत असून भारतीय संघ यात आघाडीवर आहे. तिसरा सामना हा पावसामुळे रद्द करण्याची वेळ आलेली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES