• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय

IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय

IPL 2027 Bangladesh Players In Auction : IPL 2027 साठी खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली असून यात बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडूंना सुद्धा सहभागी होण्यास परवानगी दिल्याने दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डातील ताणलेले संबंध हळू हळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 12, 2026, 12:25 IST|Updated: Nov 12, 2026, 13:03 IST
joinshare
IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय
Image Credit: IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

2

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

3

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

4

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

5

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IPL 2027 Bangladesh Players In Auction : आयपीएलचं पुढील सीजन हे मार्च 2027 मध्ये सुरु होणार आहे. यंदा आयपीएलचं हे 20 वं सीजन असून त्यापूर्वी एक मिनी ऑक्शन पार पडेल. गोव्यात यंदा 16 डिसेंबर रोजी हे ऑक्शन होणार असून यापूर्वी सध्या चर्चा ही रिटेंशन आणि ट्रेंड विंडोची सर्वाधिक होत आहे. मात्र या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट समोर येतेय ती   म्हणजे बीसीसीआयने आगामी सीजनमध्ये बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागाला मंजुरी दिली असून त्यांच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु केली आहे.  

बीसीसीआयच्या संपर्कानंतर रजिस्ट्रेशन :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या अनेक खेळाडूंनी आयपीएल मिनी ऑक्शनसाठी स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशन केलं आहे. ज्यात सर्वात खास नाव हे वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचं आहे. मागच्या सीजनमध्ये मुस्तफिजुर रहमानला केकेआरला ऑक्शनमधून निवडले होते, मात्र टाईनंतर बीसीसीआयने त्याला अचानकपणे बाहेर केले. ज्यावरून बराच वाद सुद्धा निर्माण झालेला आणि भारत आणि बांगलादेशचे क्रिकेट संबंध बिघडले होते. मात्र आता बीसीसीआयच्या या निर्णयानंतर हे संबंध आता हळू हळू पूर्वपदावर येत असल्याची चिन्ह आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'मुस्तफिजुरकडून रस दाखवल्यानंतरच बोर्डाने नोंदणी प्रक्रिया सुरू केली. बोर्डातील एका सूत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआयने दरवर्षीप्रमाणेच ऑक्शनपूर्वी विविध देशांच्या क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधून त्यांना आपापल्या खेळाडूंची नोंदणी करण्यास सांगितले होते. या विनंतीनंतरच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नोंदणी प्रक्रिया सुरू केली. मुस्तफिजुरव्यतिरिक्त, बांगलादेशचे इतर अनेक खेळाडू ज्यामध्ये नाहिद राणा, रिशाद हुसेन, हसन महमूद, तौहीद हृदोय, तास्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम यांचा समावेश आहे. यांनीही ऑक्शनसाठी नोंदणी केली आहे.

मुस्तफिजुरमुळे रंगला वाद :

आयपीएल 2026 सीजनच्या ऑक्शनमध्ये मुस्तफिजूर रहमानवर बोली लावून केकेआरने आपल्या संघात घेतलं होतं. मात्र बांगलादेशात हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे नेटकऱ्यांकडून बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देऊ नये अशी मागणी वाढत होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजुर रहमानला रिलीज करण्यास सांगितले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खूप गोंधळ उडाला आणि त्यामुळेच बांगलादेशच्या संघाने भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
IPL
Marathi News
Cricket News