IND VS ZIM : भारताला आपल्या नेतृत्वात पहिला महिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एशियन गेम्स 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर काहीच दिवसात ती कर्णधारपदावरून पायउतार झाली. त्यानंतर उपकर्णधार असलेल्या स्मृती मंधाना हिला टीम इंडियाची नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. स्मृती मंधानाने भारत विरुद्ध झिम्बाब्वे सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की तिला कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती त्याच दिवशी मिळाली, ज्या दिवशी अधिकृत निवेदन जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या घोषणेच्या आदल्या दिवशी एक आढावा बैठक झाली होती, ज्यामध्ये हरमनप्रीत कौर, मानधना, मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मृती मंधाना ही टीम इंडियाची फुल टाइम कर्णधार झाल्यावर भारतीय महिला संघाची ही पहिलीच सीरिज आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 सीरीज खेळवली जाणार असून 16 ऑक्टोबर याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत तिने सांगितलं की कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या बॅटिंग स्टाईलमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.
https://t.co/u3s5zRnIOr
काय म्हणाली स्मृती मंधाना?
भारताची ओपनर फलंदाज स्मृती मंधाना तिच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात काही बदल होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले, 'मैदानावर मी कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली आहे, पण माझ्या फलंदाजीच्या स्टाईलमध्ये कोणताही बदल होणार नाही'. सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना तिच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात काही बदल होईल का? यावर तिने उत्तर दिले, 'मैदानावर मी कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली आहे, पण माझ्या फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल होणार नाही'.
स्मृती म्हणाली की, 'मी यापूर्वी सुद्धा लीडरशिप ग्रुपचा भाग होती. त्याला संघाचं कर्णधार किंवा नेतृत्व मिळणं हे माझ्यासाठी नवीन नाही'. तसेच स्मृतीने टी20 च्या संदर्भात म्हणाली की, 'त्या चांगली कामगिरी करत आहेत, परंतु तिला 10 टक्के सुधारणा हवी आहे आणि मुलींनाही याची जाणीव आहे'.