Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आता जगातील सर्वात युवा टी20 कर्णधार बनला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 सीजनमध्ये 14 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र विरुद्व बिहार सामन्यात वैभव सूर्यवंशी हा बिहारकडून टॉस करण्यासाठी आला असून त्याने आपल्या नावावर अनोखा रेकॉर्ड नोंदवला आहे. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने 15 वर्ष आणि 232 दिवसांच्या वयात बिहार संघाचं नेतृत्व करून इतिहास रचला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड क्रोएशियाच्या जॅक याच्या नावावर होता. त्याने 17 वर्ष 311 दिवसांच्या वयात त्याने राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
18 धावा करून बाद :
इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये वैभव सूर्यवंशीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात वैभवला फारसा प्रभाव पाडता आला नाही. तो 12 बॉलमध्ये केवळ 18 धावा करून बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने त्याला क्लीन बोल्ड केले. वैभवसाठी ही पहिलीच नेतृत्वाची जबाबदारी नाही; याआधी त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोन संघासाठी उपकर्णधार म्हणून काम केले होते, ज्या वेळी इशान किशन त्या संघाचे नेतृत्व करत होता.
रायजिंग एशिया कपमध्ये सुद्धा खेळणार:
वैभव सूर्यवंशी याने भारतासाठी शेवटचा सामना हा न्यूझीलंड दौऱ्यावर दिसला होता. पाच सामन्यांच्या टी20 सीरिज त्याला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 49 धावा केल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो बिहार संघाचे नेतृत्व केवळ दोन सामन्यांसाठी करेल, कारण त्यानंतर तो 'रायझिंग स्टार्स आशिया कप'साठी भारतीय संघासोबत प्रवास करणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होत आहे.