SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चौथ्या सामन्यात भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूला सामन्यानंतर विराट कोहलीने दिलं गिफ्ट, Video केला शेअर

IND VS NZ 4th ODI : चौथ्या सामन्यात भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅट हेनरी या गोलंदाजाला विराट कोहलीने त्याची जर्सी गिफ्ट केली. सामना संपल्यावर विराट आणि मॅट हेनरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 14, 2026, 06:36 AM IST | Updated: Nov 14, 2026, 07:50 AM IST
Image Credit: भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्याला विराट कोहलीने दिलं गिफ्ट
Join

IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना शुक्रवारी खेळवला गेला. यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी 334 धावांचं टार्गेट असताना टीम इंडिया अवघ्या 89 धावांवर ऑलआउट झाली. यात टीम इंडियाची दिग्गज फलंदाजांची फळी समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरली. चौथ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी काळ ठरलेला टीम इंडियाचा फलंदाज मॅट हेनरी याला सामना संपल्यावर विराटने एक खास गिफ्ट दिलं. मॅट हेनरीने या सामन्यात विराटसह रोहित शर्मा, श्रेयस अय्यर अशा तब्बल 6 फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडने दिलेलं 334 धावांचं टार्गेट :

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाने न्यूझीलंडच्या 50 ओव्हरमध्ये 10 विकेट घेऊन 333 धावांवर रोखलं. यात न्यूझीलंडच्या विल याँगने सर्वाधिक 125 धावांची खेळी केली. तर भारतीय गोलंदाजांपैकी औकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक 2 विकेट तर अर्शदीप सिंह आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. न्यूझीलंड संघाने भारताला विजयासाठी 334 धावांचं टार्गेट दिलं. हे टार्गेट भारतीय दिग्गज फलंदाज यशस्वीपणे पूर्ण करू शकतील अशी अपेक्षा असताना टीम इंडियाची फलंदाजी ढासळली.

हेही वाचा : भर मैदानात राडा! गुरनूर बरार थेट न्यूझीलंडच्या फलंदाजाशी भिडला, विराट कोहली मधे पडला, नेमकं काय झालं? Video

विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेले भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅट हेनरीने रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांना बाद केलं. यावेळी भारताचा स्कोअर 3 विकेटवर 2 धावा असा होता. दिग्गज फलंदाज भोपळा देखील न फोडता माघारी परतले. त्यानंतरही मॅट हेनरी थांबला नाही, त्याने आपल्या गोलंदाजीने ईशान किशन, कुलदीप यादव आणि गुरनूर बरार या तिघांना सुद्धा बाद केलं. मॅट हेनरीने 9.4 ओव्हरमध्ये केवळ 27 धावा देऊन एकूण 6 विकेट घेतल्या. याशिवाय मॅथ्यू फिशरने 3 तर काईल जेमिसनने 1 विकेट घेतली. टीम इंडियाच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अवघ्या 89 धावांवर ऑलआउट केले आणि 244 धावांनी सामना जिंकला. सामना संपल्यावर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विराटने त्याची भारतीय जर्सी ही न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेनरीला गिफ्ट केली. मॅट हेनरीला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब सुद्धा मिळाला होता. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES