IPL 2027 Retain And Released Players List : आयपीएल 2027 बाबत 17 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्वाचं असून या दिवशी फ्रेंचायझी आगामी सीजनसाठी खेळाडूंच्या नावांची फायनल लिस्ट जाहीर करणार आहेत. ज्यांना आयपीएल फ्रेंचायझी या रिटेन किंवा रिलीज करतील. बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायझींना आयपीएल 2027 साठी त्यांच्या संघांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची घोषणा करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली होती. डिसेंबर महिन्यात 16 डिसेंबर रोजी गोव्यात आयपीएलचं ऑक्शन पार पडणार आहे. तेव्हा आज कोणत्या खेळाडूंना संघ रिलीज आणि रिटेन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कुठे लाईव्ह दाखवलं जाणार रिटेन्शन?
आयपीएल 2027 साठी खेळाडूंच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंच्या प्रक्रियेचे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे. मात्र या रिटेन आणि रिलीज प्रक्रियेसाठी नेमकी वेळ काय असेल, याबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. काही रिपोर्ट्सनुसार हे थेट प्रसारण संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल, तर काहींच्या मते ते संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. आयपीएल 2027 खेळाडूंच्या रिटेन्शन आणि रिलीजचं लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दाखवलं जाईल. तर याची लाईव्ह स्ट्रीमिंग जियोहॉटस्टारवर होईल.
कधी होणार आयपीएल 2027 चं ऑक्शन?
आयपीएलच्या आगामी 20 व्या सीजनसाठी यंदा गोव्यात ऑक्शन पार पडेल. हे मिनी ऑक्शन असणार असून यासाठी खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे यंदा बांगलादेशच्या खेळाडूंना सुद्धा आयपीएल ऑक्शनचा भाग होता येणार आहे, मागील वर्षी मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमधून रिलीज करण्यावरून मोठा वाद रंगला होता. 16 नोव्हेंबर रोजी गोव्यात हे ऑक्शन पार पडणार आहे.