मुंबईतील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, ICC च्या विनंतीनंतर WPL चे सामने ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर
WPL 2027 : यंदा महिला प्रीमियर लीग स्पर्धा वडोदरा आणि मुंबई अशा दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. आधी मुंबईतील ब्रेबॉन मैदानावर आयोजित करण्यात येणारे WPL चे सामने हे यंदा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहेत.
WPL 2027 : मुंबईतील क्रिकेट प्रेमींसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सीजनचे सामने आता मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहेत. यंदा महिला प्रीमियर लीग स्पर्धा वडोदरा आणि मुंबई अशा दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. 14 जानेवारी पासून या सीजनला सुरुवात होणार असून एकूण 5 संघ यात सहभागी होणार आहेत. आधी महिला प्रीमियर लीगचे सामने हे मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर आयोजित केले जाणार होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात याच स्टेडियमवर आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार होतं. अशावेळी आयसीसीने या स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याने बीसीसीआयला विनंती करून WPL चे सामने इतर ठिकाणी शिफ्ट करण्याची विनंती केली. आयसीसीच्या विनंतीचा मन ठेऊन महिला प्रीमियर लीगचे सामने हे बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर शिफ्ट केले आहेत.
कधी सुरु होणार स्पर्धा?
14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान महिला प्रीमियर लीग 2027 पार पडणार आहे. यंदा महिला प्रीमियर लीगचा हा पाचवा सीजन असून चौथ्या सीजनचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वात जिंकलं होतं. ही स्पर्धा यंदा वडोदरा आणि मुंबई या दोन शहरांमध्ये होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या संघांच्या सामन्याने होईल. 14 जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला सामना हा वडोदराच्या स्टेडियमवर पार पडेल. वडोदरा आणि मुंबई या शहरांमध्ये एकूण स्पर्धेचे प्रत्येकी 11 सामने खेळवले जातील. तर फायनल सामना हा मुंबईत खेळवला जाईल.
का बदललं स्थान?
महिला प्रीमियर लीग 2027 चे सामने हे आधी मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर होणार होते, मात्र याच ठिकाणी फेब्रुवारी मार्च दरम्यान आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन होणार आहे. त्यामुळे आयसीसीला या मैदानावर आयोजनासाठी पुरेसा वेळ हवा आहे. तेव्हा आयसीसीने बीसीसीआयला महिला प्रीमियर लीगच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची विनंती केली. बीसीसीआयने ही विनंती स्वीकारून महिला प्रीमियर लीगचे सामने हे वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले आहेत. उर्वरित वेळापत्रकात कोणतेही बदल झालेले नसून केवळ सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
WPL 2027 साठी सर्व 5 संघातील खेळाडूंची लिस्ट :
मुंबई इंडियन्स :
अमनजोत कौर, अमेलिया केर, हरमनप्रीत कौर, हेले मैथ्यूज, नताली साइवर ब्रंट, निकोला कैरी, राहिला फिरदौस, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, शबनीम इस्माइल, वैष्णवी शर्मा, सानिका चालके, श्वेता सहरावत, अक्षिता भगत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
अरुंधति रेड्डी, एलिसे पेरी, जॉर्जिया वोल, लॉरेन बेल, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, प्रथ्योषा कुमार, प्रेमा रावत, राधा यादव, ऋचा घोष, सयाली सतघरे, श्रेयंका पाटिल, स्मृति मंधाना, जेस जोनासेन, तेजल हसब्निस, वृंदा दिनेश, क्लो ट्रायॉन.
यूपी वॉरियर्स :
दीप्ति शर्मा, हरलीन देयोल, क्रांति गौड़, मेग लॅनिंग, फोएबे लिचफील्ड, प्रतिका रावल, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, तारा नॉरिस, सोफी मोलिनक्स, स्नेह राणा, ग्रेस हैरिस, सुषमा वर्मा, कैथरीन ब्राइस, मनाली दक्षिणी, सहाना पवार, आशा सोभना.
दिल्ली कॅपिटल्स :
एनाबेल सदरलैंड, चिनेले हेनरी, दीया यादव, जेमिमाह रोड्रिग्ज, लौरा वोल्वार्ड्ट, लुसी हॅमिल्टन, ममता मादीवाला, मारिजैन कप्प, मिन्नू मणि, एन श्री चरणानी, नंदनी शर्मा, निकी प्रसाद, शेफाली वर्मा, किरण नवगिरे, किर्स्टी गॉर्डन, उमा काशवी, किर्स्टी गॉर्डन, नाजमा खान.
गुजरात टायटन्स :
अनुष्का शर्मा, एशले गार्डनर, बेथ मूनी, भारती फुलमाली, जॉर्जिया वेयरहैम, हॅप्पी कुमारी, जिन्तिमणि कलिता, कनिका आहूजा, काशवी गौतम, किम गर्थ, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका सिंह, सोफी डिवाइन, तनुजा कंवर, यास्तिका भाटिया, जी कमलिनी, ओर्ला प्रेंडरगॅस्ट, समायरा राघव.