X वर व्हिडिओ पोस्ट करून कमाईची संधी; जाणून घ्या नवं फीचर कसं काम करणार?
अनेक व्हिडिओ क्रिएटर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. आता एक्सने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ क्लिपिंग टूल सादर केले आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना यामार्फत पैसे देखील कमवता येणार आहेत.
सोशल मिडियावर व्हिडिओंच्या लहान क्लिप्स शेअर करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. टीकटॅाकचे व्हिडिओ बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामवर रिल्स तयार करण्याचा ट्रे़ड पाहायला मिळत आहे. अनेक व्हिडिओ क्रिएटर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. यामुळे व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत तर होतेच, शिवाय व्हिडिओ निर्मात्यांना पैसे कमवण्याची संधीही मिळते. पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ तयार करण्याचे पैसे मिळत नाहीत, पण आता एक्सने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ क्लिपिंग टूल सादर केले आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना यामार्फत पैसे देखील कमवता येणार आहेत.
एक्सने तयार केलेले हे नवीन साधन वापरकर्त्यांची एक मोठी समस्या सोडवते. पूर्वी, मोठ्या व्हिडिओंमधून लहान क्लिप्स काढण्यासाठी थर्ड-पार्टी ॲप्स किंवा एडिटिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता होती, परंतु आता हे काम X ॲपमध्येच करता येते. X ने @XCreators खात्यावरील एका अधिकृत पोस्टद्वारे वापरकर्त्यांना या नवीन वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली. या फीचरचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जेव्हा एखादी क्लिप शेअर केली जाते, तेव्हा त्यावर 'क्लिप फ्रॉम' असे लेबल लावले जाईल. या लेबलवर क्लिक केल्यावर वापरकर्ते मूळ व्हिडिओवर पोहोचतील. यामुळे केवळ शेअर करणाऱ्याचा प्रतिसादच वाढणार नाही, तर मूळ व्हिडिओ निर्मात्याला पूर्ण श्रेय मिळेल आणि त्याची दृश्यमानताही वाढेल.
नवीन क्लिपिंग टूल X वर कसे काम करेल?
X ने सोमवारी या नवीन फीचरची घोषणा केली आहे या नव्या फीचरमध्ये वापरकर्त्यांना यापुढे व्हिडिओ डाउनलोड करून वेगळ्या एडिटिंग ॲपवर जाण्याची गरज भासणार नाही त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा फायदा होणार आहे. ते X मध्येच व्हिडिओचा एक छोटा भाग निवडून क्लिप्स तयार करू शकतील. त्यानंतर ते आपली स्वतःची मते आणि टिप्पण्या जोडून त्या थेट त्यांच्या टाइमलाइनवर पोस्ट करू शकतील. सध्या, हे फीचर iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. वेब आवृत्तीसाठी सपोर्ट नंतर येईल.
हे ही वाचा
अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! गुडघ्यावर बसून केलं रोमँटिक प्रपोज, Photo Viral
तुम्ही क्लिप्स आणि मूळ व्हिडिओ बनवूनही पैसे कमवू शकाल.
या फीचरचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे पैसे कमावण्याची संधी. X च्या ओरिजिनल कंटेंट रिवॉर्ड्स प्रोग्राम अंतर्गत, क्लिप तयार करणारा वापरकर्ता आणि मूळ व्हिडिओचा निर्माता दोघेही पैसे कमवू शकतात. तथापि, काही विशिष्ट अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. वापरकर्त्याकडे X प्रीमियम सबस्क्रिप्शन असणे, किमान 500 व्हेरिफाईड फॉलोअर्स असणे आणि गेल्या 90 दिवसांत 5,00,000 व्हेरिफाईड इम्प्रेशन्स असणे आवश्यक आहे.