काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या विवाह कार्यक्रमांना सुरुवात, ग्रँड विवाहाची तयारी पाहून थक्क व्हाल
Kavya Maran And Anirudha Wedding : गायक अनिरुद्ध आणि आयपीएलमध्ये SRH ची मालकीण काव्या मारन हे दोघे 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या शाही लग्नाची तयारी सुरु झालेली आहे. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Kavya Maran And Anirudha Wedding : आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध अनिरुद्ध रविचंदर हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. अनिरुद्ध आणि काव्या हे दोघे 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे दोघांच्या विवाह कार्यक्रमांना सुरुवात झाली असून या ग्रीसमधील शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक खास पाहुणे आणि VVIP हे ग्रीसला रवाना झाले आहेत. तर दोघांच्या विवाह सोहळ्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन हे चेन्नईत पार पडणार आहेत.
ग्रीसमध्ये शाही विवाह सोहळा :
काव्या आणि अनिरुद्ध हे दोघेच ग्रीसमध्ये 11 नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार असून जोडप्याने त्यांचं लग्न हे खूप प्रायव्हेट ठेवलं आहे. यात अत्यंत खास लोकांचा समावेश असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गायक आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हा त्याच्या नातेवाईकांसोबत दोन दिवसांपूर्वीच ग्रीसला पोहोचला आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे त्यांच्या पत्नी दुर्गा स्टॅलिन यांच्यासोबत ग्रीसला रवाना झाले आहेत. तिथे ते एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियावरील काही पॅपाराझी पेजेसनी एम. के. स्टॅलिन आणि दुर्गा स्टॅलिन यांना विमानतळावर पाहिले. दरम्यान विमानतळावरील रजनीकांत यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. उदयनिधी स्टॅलिन देखील या विवाह सोहळ्यासाठी तिथे पोहोचणार आहेत. अनिरुद्ध आणि काव्या हे दोघे ग्रीसमध्ये विवाह बंधनात अडकणार असून या सगळ्यात VVIP पाहुणे देखील सहभागी होतील. तर चेन्नईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये अनेक बडे राजकीय नेते, बिझनेस तसेच मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काव्या आणि अनिरुद्ध या जोडप्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. काव्या आणि अनिरुद्ध यांचं लग्न हे केवढं भव्य असणार आहे हे त्यांच्या लग्नपत्रिकेवरूनच लक्षात येतं. ती अत्यंत अनोख्या आणि राजेशाही थाटात तयार करण्यात आली होती.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.