• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यासाठी परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाने मांडली भूमिका

केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यासाठी परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाने मांडली भूमिका

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ही महत्वाची भूमिका मांडली . यात केवळ विवाह करण्याच्या उद्देशाने धर्मांतर करण्यास परवानगी देता येणार नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलं.

Reported Bypooja pawar
Published: Oct 23, 2026, 07:41 AM IST|Updated: Oct 23, 2026, 08:17 AM IST
joinshare
केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यासाठी परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाने मांडली भूमिका
Image Credit: केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यासाठी परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाने मांडली भूमिका

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी धर्मांतराच्याबाबत एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. केवळ विवाह करण्याच्या उद्देशाने धर्मांतर करण्यास परवानगी देता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.  उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की , प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे.  महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ही महत्वाची भूमिका मांडली आणि त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.

फक्त विवाहासाठी धर्मांतर करता येणार नाही :

ठाणे जिल्ह्यातील 70 वर्षीय मुस्लिम धर्मोपदेशकाने या कायद्याला आव्हान दिले होते. धर्मप्रसाराच्या स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे मर्यादा येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. धर्मांतरविरोधी कायद्याचा उद्देश समाजातील धर्मनिरपेक्षता टिकवणे आणि बळजबरीने किंवा दबावाखाली घडवून आणल्या जाणाऱ्या धर्मांतरांना आळा घालणे हा आहे असे खंडपीठाने म्हटले. प्रत्येक व्यक्तीला धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र केवळ विवाहासाठी धर्मांतर करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा : लवकरच भिवंडीत धावणार मेट्रो, आता मुंबईत येणे सोप्पे होणार; मेट्रो 5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

न्यायालयाने काय म्हटलं?

याचिकाकर्त्याने कायद्याच्या कलम 2 (अ) मधील 'प्रलोभन' या संकल्पनेच्या व्याख्येला तसेच धर्मातरापूर्वीच्या प्रक्रियेशी संबंधित कलम 6 आणि 7 मधील तरतुदींना आव्हान दिले होते. मात्र, या कायद्यामुळे याचिकाकर्त्याच्या अधिकारांवर नेमका कसा परिणाम झाला, याची ठोस माहिती याचिकेत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

धर्माचा प्रसार करताना सरकारी 2 हस्तक्षेपामुळे कोणत्या अडचणी आल्या, याची उदाहरणे देऊन अधिक वस्तुनिष्ठ माहिती आणि तथ्यांसह सुधारित याचिका दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले. याचिकेत मूलभूत तथ्यांचा अभाव 3 असून, आव्हान प्रामुख्याने सैद्धांतिक स्वरूपाचे असल्याचेही खंडपीठाने नमूद केले. त्यामुळे सध्याच्या याचिकेवर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि आवश्यक तथ्यांसह नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा दिली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
High court
News in Marathi
Marathi Batmya