मुंबई ते दिल्ली किती आहे आजचे पेट्रोल डिझेलचा रेट? 10 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील इंधन दर
Petrol And Diesel Rates Today 10 December 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेले बदल सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करतात. तेव्हा 10 नोव्हेंबर रोजी तुमच्या जवळच्या शहरातील इंधन दर किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
Petrol And Diesel Rates Today : दररोज प्रमाणे 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार झाल्यावर त्याच्या परिणाम अनेक गोष्टींवर होत असतो. केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील एक्साइज ड्युटी काढून टाकलेले असूनही, आज प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बऱ्यापैकी स्थिर राहिले. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाच्या किंमतीत झालेली अलीकडील वाढ भारतीय ग्राहकांवर परिणाम करू शकलेली नाही. 10 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत इंधन विक्रेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे त्यांच्या किंमती या सध्या स्थिर आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 111.68 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 116.15 रुपये प्रति लीटर
तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 99.56 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 104.23 रुपये प्रति लीटर
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आणखी हल्ल्यांचे आदेश देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तेलाच्या किंमतीतील या घसरणीमुळे महागाईबाबतची चिंता कमी होण्यास मदत झाली आहे. एक असा घटक ज्याने या वर्षभरात जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव निर्माण केला होता.
कसे तपासाल ताजे रेट्स?
ग्राहक SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतींची माहिती मिळवू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर, BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि HPCL चे ग्राहक 9222201122 या क्रमांकावर संदेश पाठवून किमतींची माहिती मिळवू शकतात.