• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, कोर्ट परिसरात सुद्धा हाय अलर्ट जाहीर

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, कोर्ट परिसरात सुद्धा हाय अलर्ट जाहीर

Thane Municipal Corporation Bomb Threat : ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी गुरुवारी प्राप्त झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी ही धमकी मिळाली असून तात्काळ पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून महापालिकेची इमारत रिकामी करण्यात आली.

Reported Bypooja pawar
Published: Nov 26, 2026, 16:39 IST|Updated: Nov 26, 2026, 17:01 IST
joinshare
ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, कोर्ट परिसरात सुद्धा हाय अलर्ट जाहीर
Image Credit: ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, कोर्ट परिसरात सुद्धा हाय अलर्ट जाहीर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Thane Municipal Corporation Bomb Threat : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील सरकारी कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात आहे. २६ नोव्हेंबर रोजी आता ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ दखल घेत पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. पोलीस आणि  आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून काहीवेळासाठी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे.  

मुख्यालयासह सर्व प्रभाग समित्यांनाही देण्यात आला अलर्ट :

ठाणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यावर तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यावर सर्वत्र घबराटीचं वातावरण निर्माण झालं. मुख्यालयासह ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांनाही अलर्ट देण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

मुंबई महापौर कार्यालयाला सुद्धा मिळालेली धमकी :

मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा एकदा धमकीचा मेल आहे. महापौर कार्यालयाला पाचव्यांदा धमकीचा ईमेल आल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत दुपारी बॉम्ब हल्ला घडवण्याची धमकी तसंच अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. महालक्ष्मी परिसरासह मेट्रो स्टेशन्स उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. फक्त मुंबईच नाहीतर नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर कोर्टालाही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट; शिवाजीनगर कोर्टाबाहेरच्या परिसरात पोलिसांच्या निर्दशानास आले भयानक वास्तव

दलजीत दोसांझ कॉन्सर्टला निशाणा बनवण्याची धमकी :

मुंबई आणि उपनगरातील प्रशासकीय कार्यालयासोबतच 27 तारखेला मुंबईमध्ये आयोजित  दलजीत दोसांझ कॉन्सर्टला सुद्धा निशाणा बनवलं जाणार असल्याची धमकी देण्यात आलेली आहे. पोलीस सायबर टीमच्या मदतीने ईमेलच्या आयपी ऍड्रेसची तपासणी करत आहे. यापूर्वी सुद्धा दलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली होती.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Thane
Mumbai