'बाळासाहेब आज हयात असते तर त्याच रात्री आम्हाला न्याय मिळाला असता', राम पूर्णेकर यांची भावनिक साद
Pradip Purnekar Murder : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला अनेक दिवस उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या राम पूर्णेकर यांनी आता थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भावनिक साद घातली आहे. ठाण्यात केलेल्या बॅनरबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Pradip Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला अनेक दिवस उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या राम पूर्णेकर यांनी आता थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भावनिक साद घातली आहे. 'माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? I Believe in Constitution, Justice for Pradeep Punekar' असा मजकूर असलेला भला मोठा बॅनर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर लावण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेना UBT चे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या आणि ठाण्याच्या माजी महापौर असलेल्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर पूर्वेकर कुटुंबाकडून हत्येचे आरोप केले जात आहेत. याच पोलीस ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, या बॅनरच्या शेजारीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना परिवाराचा बॅनरही लावण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बॅनर एकाच ठिकाणी लागल्याने परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी राम पूर्णेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, 'मागील 40 दिवसांत मी बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत, हे पाहिले आहे' असं म्हटलं.
'आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी त्याच रात्री आम्हाला न्याय मिळवून दिला असता आज 26 वर्षांचा मुलगा न्यायासाठी लढतोय हेच फक्त यांना दिसत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याकडेही आम्ही न्यायाचीच मागणी करतोय' अशी भावनिक प्रतिक्रिया राम पूर्णेकर यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचेही राम पूर्णेकर यांनी सांगितले. एका बाजूला बाळासाहेबांना अभिवादन करणारा बॅनर तर दुसऱ्या बाजूला न्यायासाठी आर्त हाक देणारा राम पूर्णेकर यांचा बॅनर यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.