• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'माझ्याकडे प्रस्ताव...', NCP विलीनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंनी अखेर सांगून टाकलं, '17 जानेवारीला अजितदादा...'

'माझ्याकडे प्रस्ताव...', NCP विलीनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंनी अखेर सांगून टाकलं, '17 जानेवारीला अजितदादा...'

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने सध्या वेग धरला आहे. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी गाठीभेटी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही "जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील" असं एका वाक्यात सूचक उत्तर दिलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 12, 2026, 19:20 IST|Updated: Nov 12, 2026, 19:36 IST
joinshare
'माझ्याकडे प्रस्ताव...', NCP विलीनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंनी अखेर सांगून टाकलं, '17 जानेवारीला अजितदादा...'
Image Credit: NCP विलीनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंनी अखेर सांगून टाकलं

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने सध्या वेग धरला आहे. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी गाठीभेटी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही  "जशी वेळ येईल  तशा गोष्टी कळतील" असं एका वाक्यात सूचक उत्तर दिलं आहे. दुसरीकडे रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विलिनीकरणाविरोधात थेट भूमिका घेतली आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणावर भाष्य केलं आहे. आपल्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"मला याची खरंच काही माहिती नाही. तसा माझ्याकडे कोणता प्रस्तावही आलेला नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या एकत्रिकीकरणाबद्दल बोलत आहात मला माहिती नाही. माझ्याशी कोणी बोललेलं नाही," असं सांगत सुप्रिया सुळे यांनी चर्चा फेटाळून लावल्या.

'शरद पवारांना देशातील सर्वच पक्षांचे नेते भेटतात'

"एक तर शरद पवारांना देशातील सर्वच पक्षांचे नेते भेटत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांचा गट वेगळा झाला त्यानंतरही तेथील अनेक नेते, मंत्री शरद पवारांना भेटतात. त्याच्यामुळे त्यात काही नवीन किंवा वावगं नाही असं त्यांनी म्हटलं. अमित शाह यांच्या भेटीचा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर बोलू शकत नाही," असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा - NCP विलीनीकरणाचं अखेर ठरलं? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात संपवला विषय, म्हणाल्या ‘सर्व गोष्टी....’

'माझा भाऊ गेला तेव्हाच पूर्णविराम'

"ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्यानंतर दोन तीन दिवसात ज्या घटना घडल्या त्यानंतर मी स्वत: या विषयावर पडदा टाकला. माझा भाऊ गेला तेव्हाच त्याला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी तो विषय तेव्हाच संपला," असं त्यांनी स्पष्ट केलं.

'अजित पवार असेपर्यंत चर्चा होती'

"अजित पवार असेपर्यंत चर्चा होती. माझ्याशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं सर्वांशी बोलला होता. गोविंदबागमधील 17 जानेवारीचा व्हिडीओ सर्वांनी दाखवला होता. जगाला माहिती होतं की, दादा आणि आम्ही काय करणार आहोत. त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नव्हतं. पण दादा अचानक गेल्यानंर माझ्याकडून त्या गोष्टीला पूर्णविराम देण्यात आला," असा त्यांनी पुनरुच्चार केला.

विलिनीकरणाबाबत रोहित पवारांनी काय म्हटलंय?


विलिनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपा सोबत असताना विलिनीकरणाचा तर विषय सुद्धा येत नाही. त्यामुळे “आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही”, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे. मुंढवा प्रकरणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करूनही अजितदादांनी भाजपला कणभर देखील भीक घातली नव्हती. दादांना ब्लॅकमेल कोण करत होतं? किंवा ब्लॅकमेल करण्याचे आदेश कुणाचे होते? त्यामुळे ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचं राजकारण उभं आहे, अशा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रकरण्याच्या  विषयात न बोललेलंच बरं..! असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.


संजय राऊतांचं उपहासात्मक विधान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर खासदार संजय राऊत उपहासात्मक भाष्य केलं आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विलीनीकरण हा एक नवीन खेळ आणून ऑलिम्पिकमध्ये मर्जर मर्जर खेळ आणावा असा टोला राऊतांनी लगावला आहे.

'दोन राष्ट्रवादीमध्ये तिसरा गट निर्माण होईल,' शिरसाटांचा दावा

एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झडत असताना मंत्री संजय शिरसाटांनी वेगळीच भविष्यवाणी केली आहे. दोन राष्ट्रवादीमध्ये तिसरा गट निर्माण होईल असा दावा शिरसाटांनी केला आहे. यावरुन मंत्री हसन मुश्रीफांना संताप व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना कडक शब्दांत समज द्यावी असं म्हटलं आहे.


तसंच काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी खळबळजनक विधान केलं आहे. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असा दावा अतुल लोंढेंनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supriya Sule
Sharad Pawar
Sunetra Pawar