• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /NCP विलीनीकरणाचं अखेर ठरलं? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात संपवला विषय, म्हणाल्या ‘सर्व गोष्टी....’

NCP विलीनीकरणाचं अखेर ठरलं? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात संपवला विषय, म्हणाल्या ‘सर्व गोष्टी....’

राज्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकऱणासंदर्भात चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यावर भाष्य केलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 11:53 IST|Updated: Nov 11, 2026, 12:12 IST
joinshare
NCP विलीनीकरणाचं अखेर ठरलं? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात संपवला विषय, म्हणाल्या ‘सर्व गोष्टी....’
Image Credit: NCP विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकऱणासंदर्भात चर्चा रंगली असून दोन्ही बाजूंनी यासंदर्भात विधानं केली जात आहे. यादरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. "जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतील," असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केलं आहे. मात्र यापेक्षा जास्त भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सुनेत्रा पवारांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं की, 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंढा जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाने विविध कार्यक्रमांची आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची आणि इतर गोष्टींची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. त्यांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. "जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतील," इतकंच सांगून त्यांनी पत्रकार परिषद आटोपली.

भाजपाच्या सिग्नलची प्रतिक्षा?

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील बड्या नेत्यांकडूनही विलिनीकरणासंदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. त्यातच आता विलिनीकरणासाठी भाजपाच्या ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत निर्णय होऊ शकतो अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झाली आहे.

हे ही वाचा - 'अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार...', NCP विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठा गौप्यस्फोट, 'आज शरद पवारांना भेटून...'
 

शरद पवार आणि प्रफुल पटेलांच्या रुग्णालयातील भेटीनंतर राष्ट्रवादीत विलिनीकरणाचे फटाके फूट लागले आहेत. दोन्ही बाजूंचे अनेक नेते विलीनीकरणाबाबत सकारात्मक असून तशी विधानंही वारंवार केली जात आहेत. याशिवाय खासदार पार्थ पवारांनी सलग 3 दिवस शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. अशातच आता राष्ट्रवादीच्या आमदारानी शरद पवारांच्या भेटीसाठी बुधवारची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत आता भाजपच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा असल्याचं समजत आहे. याशिवाय विलीनीकरणानंतर नेतृत्व, अर्थखाते कोणाकडे? याबाबत घोडं अडल्याचं कळत आहे.


राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात प्रमुख अडचणी! 


1) कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार?
2) विलिनीकरणानंतर नेतृत्व कोणाकडे जाणार?
3) भाजपसोबत जाण्याबाबत काय निर्णय घ्यायचा? 
4) विलीनीकरण झाले तर NCPला अर्थ खाते दिले जाणार का? 
5) विलीनीकरणानंतर सत्तेत गेल्यास अर्थखाते कोणाकडे द्यायचे? 
6) केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे, तटकरे की प्रफुल पटेलांना संधी मिळणार? 
7) रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय?
8) शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांना अजित पवार गट स्वीकारेल का?

फडणवीसांनी मांडली भूमिका

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका गटाचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं समजत आहे. देशात भाजपविरोधी वातावरण असून भविष्यात हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 
त्यामुळे आता भाजप सोबत जाणे योग्य राहील का? अशी भूमिका पवार गटातील काही नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारीक गप्पांमध्ये मोठं भाष्य केलं आहे.

विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार हेच ठरवतील. विलिनीकरण होणार असेल तर ते आम्हाला सांगतील. पण आमच्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही असं ते म्हणाले आहेत. अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे. अजित पवार तावून सुलाखून निघालेले होते. सुनेत्रा पवार आता आलेल्या आहेत, त्यांच्यात सुधारणा होतीये असंही त्यांनी म्हटलं. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sunetra Pawar
Sharad Pawar