शेअर बाजार : दिवाळीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना देखील आज 8 नोव्हेंबर रोजी फक्त 60 मिनिटांसाठी शेअर बाजार उघडला होता. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भारतीय शेअर बाजारात आज विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. मुहूर्त ट्रेडिंगला बीएसईमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली. दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये घरसण पहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले.
भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. या परंपरेनुसार गुंतवणूकदार नवीन वर्षाची सुरुवात शेअर्सच्या खरेदी-विक्रीने करता. मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त विशेष सत्राचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंग झाले.
यंदा बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ दुपारचा होता. दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी प्री-ओपन सत्राला सुरुवात झाली. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांपासून प्रत्यक्ष मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले. हे विशेष ट्रेडिंग सत्र दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत सुरू होते.
8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स 234.10 अंकांनी, म्हणजेच 0.29 टक्क्यांनी वाढून 81,262.12 अंकांवर उघडला, तर निफ्टी 50 41.50 अंकांनी, म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 25,071.85 अंकांवर पोहोचला.
सेन्सेक्स 28.62 अंकांनी, म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 80,999.40 वर बंद झाला. दरम्यान, निफ्टी 50 43.95 अंकांनी, म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 24,986.40 वर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक 25,000 अंकानी घसरला.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये तेजी पहायला मिळाली. निफ्टी मिडकॅपचा निर्देशांक 100 अंकांनी वाढून 60706 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी स्मॉलकॅपचा निर्देशांक 185 अंकांनी वाढून 19160 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात एमसीएक्स, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अशोक लेलँड यांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये आरआरकेएबीईएल, टीडी पॉवर सिस्टीम्स आणि नेटवेब यांच्या शेअर्समध्ये 5 ते 80 टक्क्यांची वाढ दिसून आली.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये व्यवहारादरम्यान निफ्टीच्या निर्देशांकाेन गुंतवणूकरादारांना काहिसा दिलासा दिला. यात 1.84 टक्केची वाढ झाली. निफ्टी फार्मा 1.70 टक्केने वाढला, त्याखालोखाल निफ्टी हेल्थकेअरमध्ये 1.46 टक्के आणि निफ्टी मेटलमध्ये 0.36 टक्केची वाढ झाली.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये रिअल इस्टेट आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सवर दबाव पहायला मिळाला. निफ्टी रियल्टीचा निर्देशांक 0.66 टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँकचा निर्देशांक देखील 0.40 टक्केने घसरला. दरम्यान, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.38 टक्के आणि निफ्टी आयटी 0.33 टक्के घसरणीसह बंद झाला.