SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मनमोहन सिंग यांना हटवून 2010 मध्ये काँग्रेसच्या 'या' नेत्याला व्हायचं होतं पंतप्रधान, सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा; 'मला धक्का...'

सोनिया गांधींनी त्याच्या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं असून यामध्ये कशाप्रकारे एका ज्येष्ठ नेत्याने स्वत:ला पंतप्रधान बनवण्यासंदर्भातील विचारणा अप्रत्यक्षपणे केली होती याबद्दलचाही किस्सा सांगितलाय. नेमका हा नेता कोण आणि तो काय म्हणालेला पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 08:03 IST | Updated: Nov 11, 2026, 08:27 IST
Image Credit: आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितला हा नेमका किस्सा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य वृत्तसंस्थांकडून साभार)
Join

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव' (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्राचं काल प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये यापूर्वी कधीही समोर न आलेल्या अनेक गोष्टीबाबत सोनिया गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. पडद्यामागील अनेक किस्से, गोष्टी आणि घटनांवर सोनिया गांधींनी प्रकाश टाकला आहे. पुस्तकात एका ठिकाणी त्यांनी कशाप्रकारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पदावरुन हटवून स्वत:ला पंतप्रधान करण्यासाठी एक ज्येष्ठ नेता प्रयत्न करत होता याबद्दल भाष्य केलं आहे. यावर या नेत्याच्या मुलीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

हा नेता कोण?

मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान ज्यावेळेस सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यावेळी त्यांच्याकडे पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान होण्याच्या इच्छा व्यक्त केली होती. सोनिया गांधींनी हा खुलासा प्रणव मुखर्जींसोबत झालेल्या एका संवादाचा संदर्भ देत केला आहे. 

नक्की काय सल्ला दिला होता या नेत्याने?

सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, "2010 मध्ये एका संभाषणादरम्यान प्रणव मुखर्जी यांनी त्यांना "आता शीर्ष स्तरावर (नेतृत्वात) बदल करण्याची वेळ आली आहे" असे सूचक विधान केलं होतं. प्रणव मुखर्जींच्या विधानाने मला धक्काच बसला. हे विधान आश्चर्यचकित करणारं होतं."  सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जींनी 'टॉप लेव्हलमध्ये बदल करण्याची गरज' या विधानाचा प्रणव मुखर्जी यांची पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा होती असा अर्थ आपल्या पुस्तकात लावला आहे.

नक्की वाचा>>
'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'

नंतर झाले राष्ट्रपती

याच पुस्तकामध्ये पुस्तकात असाही उल्लेख आहे की, तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. मुखर्जी यांचे हे बोलणे ऐकून सोनिया गांधी यांनी सहजपणे संभाषणाचा विषय बदलला होता, असंही पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर 2012 मध्ये काँग्रेसने त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवले होते. 2012 ते 2017 या काळात भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी सर्वोच्च पदावर विराजमान होते.

नेत्याच्या मुलीने या खुलाश्यावरुन सोनिया गांधींना विचारला सवाल

सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकातून केलेल्या या खुलाशावर प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. "एखाद्या योग्य आणि अनुभवी नेत्याने पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा आहे का? यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?" असा सवाल शर्मिठा मुखर्जींनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES