SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

14 नोव्हेंबरला तुमच्या शहरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर

Petrol And Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार तुमच्या शहरात आजचे इंधन दर किती आहेत याविषयी जाणून घ्या.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 14, 2026, 08:51 AM IST | Updated: Nov 14, 2026, 09:20 AM IST
Image Credit: 14 नोव्हेंबरला तुमच्या शहरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर
Join

Petrol And Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार झाल्यास अनेक गोष्टींवर त्याचा आर्थिक परिणाम होत असतो. मागच्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली होती. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 90 डॉलर प्रति बॅरेलच्या खाली आल्या आहेत. मात्र असं असूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले आहेत. सकाळी 6 वाजता दररोज प्रमाणे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या असून यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रति लिटर किंमती :

नई दिल्ली - 102.12 रुपये

कोलकाता - 113.51 रुपये

मुंबई - 111.21 रुपये

चेन्नई - 107.76 रुपये

लखनऊ - 101.86 रुपये

नोएडा - 101.96 रुपये

पटना - 113.37 रुपये

तिरुअनंतपुरम् - 115.49 रुपये

हैदराबाद - 116.51 रुपये

जयपुर - 110 रुपये

चंडीगढ़ - 101.54 रुपये

गुरुग्राम - 102.97 रुपये

बंगळुरू - 111.68 रुपये

हेही वाचा : हवामान फिरणार! अवघ्या 20 दिवसांत तिसऱ्या चक्रीवादळाचा अंदाज, महाराष्ट्रात गारठा वाढणार

तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रति लिटर किंमती :

दिल्ली - 95.20 रुपये

कोलकाता - 99.82 रुपये

चेन्नई - 99.55 रुपये

मुंबई - 97.83 रुपये

लखनऊ - 95.36 रुपये

नोएडा - 95.44 रुपये

पटना - 113.37 रुपये

तिरुअनंतपुरम् - 104.40 रुपये

हैदराबाद - 104.23 रुपये

जयपुर - 98.25 रुपये

बंगळुरू - 99.56 रुपये

गुरुग्राम - 95.64 रुपये

चंडीगढ़ - 89.47 रुपये

कसे तपासाल पेट्रोल आणि डिझेलचे ताजे रेट्स?

पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतींची माहितीसाठी SMS सर्व्हिसचा वापर ग्राहक करू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर, BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि HPCL चे ग्राहक 9222201122  या क्रमांकावर संदेश पाठवून किमतींची माहिती मिळवू शकतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES