11 शहरांमधील CNG च्या किंमतीत वाढ, पाहा मुंबई ते दिल्ली पेट्रोल, डिझेल अन् CNG च्या आजच्या किंमती
Petrol, Diesel And CNG Rates Today : दररोज प्रमाणे 12 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि CNG यांचे ताजे दर जाहीर केले आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील आजचे ताजे इंधन दर जाणून घेऊयात.
Petrol, Diesel And CNG Rates Today : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि CNG इत्यादी इंधनाचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार 12 नोव्हेंबर रोजी प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झालेला नाही. मात्र देशातील 7 शहरांमध्ये CNG च्या किंमतीत मात्र वाढ झालेली आहे. काही शहरांमध्ये CNG च्या किंमतींमध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या ताज्या किंमती जाणून घ्या.
देशातील प्रमुख शहरांमध्ये किती आहेत इंधन दर?
12 नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती या प्रति लीटर 102.12 रुपये तर डिझेलच्या किंमती या प्रति लीटर 95.20 रुपये इतक्या आहेत. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पेट्रोलची 111.21 रुपये तर डिझेलची 97.83 प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लीटर इतकं आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.76 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 99.55 रुपये नोंदवला गेला. या चार महानगरांपैकी कोलकातामध्ये दोन्ही इंधनांचे दर सर्वाधिक होते. तर त्यांच्या तुलनेत नवी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वात कमी होते.
12 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 111.68 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 116.15 रुपये प्रति लीटर
12 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रतिलिटर) :
नवी दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
बेंगळुरू : 99.56 रुपये प्रति लीटर
हैदराबाद : 104.23 रुपये प्रति लीटर
CNG दरात वाढ :
मथुरेमध्ये सीएनजीचा दर सर्वाधिक, म्हणजेच प्रति किलो 104 रुपये इतका होता. बेंगळुरू, भरतपूर आणि देवासमध्ये सीएनजीच्या किंमतीत 1 रुपयाची वाढ होऊन ती प्रति किलो 99 रुपयांवर पोहोचली आहे. फिरोजाबादमध्ये 40 पैशांची वाढ नोंदवण्यात आली असून, तिथे सीएनजीची किंमत प्रति किलो 99.90 रुपये झाली आहे.
मेरठ आणि सोनीपतमध्ये CNG च्या किंमतीत प्रति किलो 1 रुपयाची वाढ झाली आहे. मेरठमध्ये CNG ची किंमत 96.50 रुपये, तर सोनीपतमध्ये 96 रुपये प्रति किलो इतकी नोंदवण्यात आली. चेन्नईमध्ये हा दर 99.50 रुपये, तर रेवाडीमध्ये 91.59 रुपये इतका होता.नवी दिल्लीमध्ये CNG चा दर 86.98 रुपये प्रति किलो इतका आहे. मुंबईत CNG च्या किंमती प्रति किलो 89 रुपये आहेत.