/E20 पेट्रोलमध्ये 20% नाही तर 31.2% इथेनॉल... हादरवणारा अहवाल; वाहनांचा खर्च वाढण्याची भीती! इंडियन ऑइल, HP, भारत पेट्रोलियममध्ये किती इथेनॉल? तुम्ही कोणतं पेट्रोल टाकता?
E20 पेट्रोलमध्ये 20% नाही तर 31.2% इथेनॉल... हादरवणारा अहवाल; वाहनांचा खर्च वाढण्याची भीती! इंडियन ऑइल, HP, भारत पेट्रोलियममध्ये किती इथेनॉल? तुम्ही कोणतं पेट्रोल टाकता?
भारतामध्ये ई-20 चा विषय मागील काही काळापासून चर्चेत असतानाच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नेमकं काय आहे या अहवालामध्ये जाणून घ्या सविस्तरपणे...
हा अहवालाचा संदर्भ देत राहुल गांधींनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे. नेमकं काय म्हणालेत राहुल गांधी जाणून घ्या...
1/9
पेट्रोलमधील इथेनॉलबद्दलचं धक्कादायक वास्तव
वाहनांमधील पेट्रोलमधील इथेनॉलबद्दलचं धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आलंय. त्याबद्दलच जाणून घेऊयात सविस्तरपणे....
2/9
मोदी सरकारच्या धोरणावरून प्रश्न
राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदी सरकारच्या धोरणावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. 7 जिल्ह्यांतील 14 नमुन्यांची तपासणी; 11 नमुन्यांमध्ये 20% पेक्षा अधिक इथेनॉल असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
3/9
कोणत्या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल?
इंडियन ऑइल म्हणजेच IOCL च्या पेट्रोलमध्ये 31.2%, तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या म्हणजेच HPCL च्या पेट्रोलमध्ये 30.5% इथेनॉल आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
4/9
खर्चावर परिणाम होण्याची भीती
भारत पेट्रोलियम म्हणजेच BPCL, नायरा आणि 'शेल'च्या नमुन्यांमध्येही 20% पेक्षा अधिक इथेनॉल आढळल्याचा दावा कर्नाटकमधील अहवालाचा संदर्भ देत केला आहे. वाहनांचे मायलेज, इंजिनची कार्यक्षमता आणि दुरुस्ती खर्चावर परिणाम होण्याची भीती राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
5/9
राहुल गांधींचा इशारा
E20 चा मुद्दा काँग्रेस देशभरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित करणार, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
6/9
इंधन निवडण्याचा अधिकार का नाही?
जनतेच्या वाहनांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल मिसळले जात आहे आणि ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे इंधन निवडण्याचा अधिकार का नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
7/9
कंपन्यांचा सरकारच्या तपासणी पद्धतीवर आक्षेप
दरम्यान, IOCL, BPCL आणि HPCL यांनी कर्नाटक सरकारच्या तपासणी पद्धतीवर आक्षेप घेतला असून, त्यांच्या तपासणीत इंधन निर्धारित मानकांनुसार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वतंत्र आणि पारदर्शक तपासणीची मागणी जोर धरत आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य रॉयटर्स आणि सोशल मीडियावरुन साभार)
8/9
राहुल गांधींची पोस्ट
राहुल गांधींनी केलेली हीच ती पोस्ट
9/9
सरकारच्या तपासणीचा संदर्भ देत धक्कादायक खुलासा
20% इथेनॉलची मर्यादा ओलांडून पेट्रोलमध्ये तब्बल 31.2% इथेनॉल मिसळल्याचा दावा कर्नाटक सरकारच्या तपासणीचा संदर्भ देत केला जात आहे.