हार्दिक पांड्याने सोडली साथ, आता मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? 4 नावं शर्यतीत
Who Will Be The Next Captain Of Mumbai Indians : हार्दिक पांड्या ट्रेड होऊन पंजाब किंग्स सोबत गेल्यावर आता आगामी आयपीएल 2027 सीजनसाठी मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण असणार याची उत्सुकतता निर्माण झाली आहे. तेव्हा 4 मोठी नावं ही कर्णधार पदाच्या शर्यतीत आहेत.
Mumbai Indians Next Captain IPL 2027 : 2024 मध्ये गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आलेल्या हार्दिक पांड्याने मागील 3 वर्ष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाचा परफॉर्मन्स ढासळला. त्यानंतर आयपीएल 2027 पूर्वी हार्दिक पांड्या पुन्हा एकदा ट्रेड होऊन पंजाब किंग्समध्ये सामील झालाय. तर पंजाब किंग्समधील गोलंदाज अर्शदीप सिंह याला मुंबई इंडियन्समध्ये सामील करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. आता हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये सामील झाल्यावर आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असणार याविषयी उत्सुकतता निर्माण झालीये. तेव्हा मुंबई इंडियन्समधील कोणती चार नावं कर्णधारपदाची शर्यतीत आहेत याविषयी जाणून घेऊयात.
कोणती नावं कर्णधार पदाच्या शर्यतीत?
रोहित शर्मा :
मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्यासाठी सर्वात वरती जर कोणाचं नाव असेल तर ते रोहित शर्माचं आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. तो बराचकाळ मुंबई इंडियन्स कर्णधार राहिला. त्यामुळे आता हार्दिक नसताना त्याच्याकडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.
तिलक वर्मा :
हार्दिक पांड्यानंतर युवा फलंदाज तिलक वर्माकडे मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तिलक अजूनही मुंबईसाठी खेळत आहे. त्याला संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
हेही वाचा : 'MI पलटण दुनिया हिला देंगे', मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच काय म्हणाला अर्शदीप सिंह?
सूर्यकुमार यादव :
भारताचा माजी टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. सूर्याकडे कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्ड कप 2026 सुद्धा जिंकला.
जसप्रीत बुमराह :
भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्ससाठी कर्णधारपदाचा योग्य दावेदार असू शकतो. बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तो आजही या फ्रँचायझीचा भाग आहे. तो संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक असून त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. बुमराहकडे सुद्धा संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.