• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'MI पलटण दुनिया हिला देंगे', मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच काय म्हणाला अर्शदीप सिंह?

'MI पलटण दुनिया हिला देंगे', मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच काय म्हणाला अर्शदीप सिंह?

Mumbai Indians Arshdeep Singh : मुंबई इंडियन्समधून हार्दिक पांड्या ट्रेड होऊन पंजाब किंग्सकडे गेला तर त्याबदल्यात 27 वर्षांचा गोलंदाज अर्शदीप सिंह हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. तेव्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यावर अर्शदीपची पहिली रिऍक्शन समोर आलेली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 11, 2026, 14:50 IST|Updated: Nov 11, 2026, 15:14 IST
joinshare
'MI पलटण दुनिया हिला देंगे', मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच काय म्हणाला अर्शदीप सिंह?
Image Credit: मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच काय म्हणाला अर्शदीप सिंह?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Mumbai Indians Arshdeep Singh : बुधवार 11 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2027 पूर्वीच्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित ट्रेडची घोषणा करण्यात आली. यामध्ये हार्दिक पांड्या याला मुंबई इंडियन्समधून पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आलं. तर पंजाब किंग्सने त्याबदल्यात अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केलं. अनेक दिवसांपासून या ट्रेडची चर्चा होती मात्र आज अधिकृत घोषणा करण्यात आली. हार्दिक हा 18 कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झालेला आहे.  जे त्याच्या सध्याच्या 16.35 कोटी रुपयांच्या मानधनापेक्षा जास्त आहे. तर अर्शदीप 18 कोटी रुपयांच्या आपल्या सध्याच्या मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झालाय. मुंबई इंडियन्सच्या संघाला एका घातक गोलंदाजांची अपेक्षा होती आणि अर्शदीपच्या रूपाने हा चांगला गोलंदाज मिळाला असल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स सुद्धा खुश आहेत. अशातच अर्शदीप सिंहने मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यावर एक व्हिडीओ शेअर केला आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाला अर्शदीप सिंह?

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झालेला गोलंदाज अर्शदीप सिंह म्हणाला की, 'कसं काय मुंबई? मला खूप आनंद होतोय की मला मुंबई इंडियन्सच्या संघाचं, त्यांच्या कुटुंबाचा भाग बनण्याचं भाग्य मिळालं. वानखेडे स्टेडियमच ग्राउंड आणि वानखेडेचा क्राउड तुम्हाला माहितीच आहे की मला तो किती आवडतो. मी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक, जसप्रीत बुमराह यांच्या सोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास उत्सुक आहे. MI पलटण दुनिया हिला देंगे'. अर्शदीपच्या या मेसेजमुळे मुंबईचे फॅन्स इम्प्रेस झाले असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Indians
IPL
Marathi News