IPL 2027 Trade Deal: आयपीएल 2027 च्या नव्या सीजनसाठी फॅन्समध्ये मोठी उत्सुकतता आहे. येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व संघांना त्यांच्या रिटेन, रिलीज खेळाडूंची नाव जाहीर करण्यास सांगितली आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्याला आयपीएल 2027 साठीचं मिनी ऑक्शन गोव्यात पार पडेल. त्याच्यापूर्वी एक आठवडाआधी ट्रेडिंग विंडो खुली राहणार आहे. आतापर्यंत आयपीएल 2027 पूर्वी अनेक मोठे ट्रेड समोर आलेले आहेत. तेव्हा आतापर्यंत आयपीएल 2027 पूर्वी कोणत्या खेळाडूंनी ट्रेड डीलद्वारे संघ बदलला आहे याविषयी माहिती करून घ्या.
हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह :
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी ही ट्रेड जाई असून या माध्यमातून मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हार्दिक पंड्या हा 18 कोटींच्या मानधनासह पंजाब किंग्समध्ये गेला आहे. यापूर्वी मागच्या सीजनमध्ये हार्दिकला 16.35 कोटी रुपये दिले गेले होते. हार्दिकच्या बदल्यात अर्शदीप सिंह हा 18 कोटींच्या मानधनासह मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड झाला आहे.
ऋषभ पंत आणि कुलदीप यादव :
आयपीएल 2026 नंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार असलेला ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड झाला. मात्र हा पंतसाठी नुकसानीचा सौदा ठरला. ऋषभ पंतला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने 27 कोटींना विकत घेतलेलं, ज्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला. मात्र आता पुन्हा ट्रेड होताना दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंत हा 15 कोटींच्या मानधनावर सामील झालाय. तर त्याच्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्समधून कुलदीप यादव हा 13.25 कोटींच्या मानधनावर लखनऊ सुपर जाएंट्सकडे गेला आहे.
टी. नटराजन आणि जीशान अंसारी :
टी. नटराजन हा आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्समधून सनरायजर्स हैदराबादमध्ये ट्रेड झाला आहे. मागच्या सीजनमध्ये त्याला दिल्लीकडून 10.75 कोटींचे मानधन मिळत होते, मात्र आता त्याला आगामी सीजनसाठी 5 कोटी इतकेच मानधन मिळणार आहे. तर जीशान अंसारी हा त्याबदल्यात सनरायजर्स हैदराबादमधून 40 लाखांच्या किंमतीवर दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड झाला आहे.
चेन्नई आणि हैदराबादमध्ये चार खेळाडूंचा ट्रेड :
लियाम लिविंगस्टोन: सनरायजर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्स – 6 कोटी रुपये (आधीचं मानधन 13 कोटी रुपये)
जॅक एडवर्ड्स : सनरायजर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्स – 3 कोटी रुपये
खलील अहमद : चेन्नई सुपर किंग्सकडून सनराइजर्स हैदराबाद – 4.8 कोटी रुपये
नाथन एलिस : चेन्नई सुपर किंग्सकडून सनराइजर्स हैदराबाद – 2 कोटी रुपये