IND VS NZ 3rd Match Weather Reports : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा वनडे सामना हा मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सकाळी 7: 30 च्या सुमारास तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार होती तर 7 वाजता या सामन्याचा टॉस पार पडणार होता. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच सेडन पार्क येथे पाऊस पडला त्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत आहे. बातमी लिहीपर्यंत सामन्याचा टॉस देखील झाला नव्हता. तेव्हा तिसऱ्या सामन्यात सुद्धा पावसाने खोडा घातला आहे. तेव्हा आज सामना होत असलेल्या ठिकाणी हवामान कसं असणार आहे याबाबत रिपोर्ट जाणून घेऊयात.
पहिल्या वनडे सामन्यात सुद्धा पावसाने खोडा घातलेला. मात्र सामन्यात भारतीय संघाने सुधारित लक्ष्य गाठत DLS पद्धतीनुसार 5 विकेट्स राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यातही भारताने DLS पद्धतीनुसारच 4 धावांनी विजय मिळवला.
कसं आहे हॅमिल्टन येथील हवामान?
न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र रिपोर्ट्सनुसार सामना सुरु होण्याच्या वेळी म्हणजेच जवळपास 3 वाजता 75 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर सुद्धा पावसामुळे व्यत्यय येणे सुरूच राहू शकते. सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता या सामन्याचा टॉस पार पडणार होता. मात्र त्यानंतर टॉसला उशीर झाला आणि तो 7: 30 वाजता घेण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र मैदानात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि पुन्हा मैदानात कव्हर्स टाकण्यात आले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांच्या सरावावर सुद्धा परिणाम झाला होता.
भारतीय संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड़, मोहम्मद सिराज, ईशान किशन, कुलदीप यादव.
न्यूझीलंडचा संघ :
विल यंग, टिम सीफर्ट, हेनरी निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिशेल सैंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, काइल जैमीसन, जैकब डफी, मैथ्यू फिशर, क्रिस्टियन क्लार्क, माइकल ब्रेसवेल, निक केली.