IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील चौथा सामना 13 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुईच्या बे ओवल मैदानावर होत असून यात प्रथम टॉस जिंकून टीम इंडियाने गोलंदाजी निवडली होती. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 333 धावा केल्या. तर भारताने त्यांच्या 10 विकेट्स घेतल्या. चौथ्या सामन्यात भारताला विजयासाठी 334 धावांचे आव्हान मिळाले. मात्र यावेळी दिग्गजांचा समावेश असलेली भारताची टॉप ऑर्डर शुन्य धावा करून परतली. रोहित, विराट, श्रेयस यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. न्यूझीलंड विरुद्ध भारताचा स्कोअर 2 धावांवर 3 विकेट असा होता.
भारताला मिळालं 334 धावांचे टार्गेट :
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. यावेळी न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना विल याँगने सर्वाधिक 125 धावा केल्या. टिम सायफर्टने 58 तर फिन ॲलन 41 धावा केल्या. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या 10 विकेट्स घेतल्या. यात औकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक 2 विकेट तर अर्शदीप सिंह आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 334 धावांचे आव्हान दिले.
Matt Henry First Over Replay Vs India Pair is so goated that both scored today Made their fan clubs cry equally Rohit Sharma - 0 Virat Kohli - 0 Shreyas Iyer - 0 What a start from Matt Henry! NZvsIND INDvsNZ https://t.co/4pAuVBNKuh
WisdomofBharat1) November 13, 2026
रोहित, विराट, श्रेयस भोपळाही न फोडता तंबूत :
चौथ्या सामन्यात भारताला विजयासाठी 334 धावांचं आव्हान मिळालं असताना हे आव्हान दिग्गज फलंदाजांची फळी असलेल्या टीम इंडियासमोर फार मोठं वाटत नव्हतं. मात्र जेव्हा फलंदाजीला सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेनरीने पहिल्याच ओव्हरला थेट तीन भारतीय दिग्गज फलंदाजांना माघारी धाडलं. आधी रोहित शर्मा नंतर विराट कोहली आणि मग कर्णधार श्रेयस अय्यर हे तिघे भोपळा देखील न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताची मजबूत टॉप ऑर्डर अशा प्रकारे माघारी गेल्याने टीम इंडिया टेन्शनमध्ये आली. त्यानंतर काहीकाळ ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल यांनी खेळ सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर फारकाळ त्यांचा टिकाव लागला नाही. अक्षर पटेल जेव्हा बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर 53 धावांवर 5 विकेट एवढा होता.