SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चौथ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फेल, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 244 धावांनी विजय मिळवला. चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 334 धावांचं टार्गेट मिळालं होतं. मात्र हे आव्हान टीम इंडिया पूर्ण करू शकली नाही

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 13, 2026, 13:44 IST | Updated: Nov 13, 2026, 14:27 IST
Image Credit: चौथ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फेल, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय
Join

IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील चौथा सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळवला गेला. सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून 2-0 ने सीरिजमध्ये आघाडी मिळवली होती. तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 334 धावांचं टार्गेट मिळालं होतं. मात्र हे आव्हान टीम इंडिया पूर्ण करू शकली नाही आणि 89 धावांवर ऑलआउट झाली. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय झाला असून त्यांनी वनडे सीरिजमध्ये 1-2 ने मजल मारली आहे.

न्यूझीलंडने दिलं 334 धावांचे आव्हान :

टीम इंडियाचा नियमित वनडे कर्णधार शुभमन गिल हा आगामी टेस्ट सीरिजच्या सरावात असल्याने तो न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या आणि पाचव्या सामन्यात टीम इंडियाच्या वनडे संघाचा भाग नाही. त्यामुळे टीम दोन वनडे सामन्यात श्रेयस अय्यर हा भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व करतोय. याआधी कधीच श्रेयसने वनडे संघाचं नेतृत्व केलेलं नव्हतं. टीम इंडियाचा 29 वा वनडे कर्णधार असेल्या श्रेयस अय्यरने चौथ्या सामन्याचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून 333 धावांची खेळी केली. टीम इंडियाला विजयासाठी 334 धावांचे आव्हान दिले. यात न्यूझीलंडकडून विल याँगने सर्वाधिक 125 धावा केल्या. तर टिम सायफर्टने 58 आणि फिन ॲलन 41 धावा केल्या. भारताचे गोलंदाज औकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक 2 विकेट तर अर्शदीप सिंह आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

भारताची फलंदाजी ढासळली :

न्यूझीलंडने भारताला विजयासाठी दिलेलं आव्हान हे भारतीय फलंदाजीच्या दिग्गज फळीसमोर फार मोठं वाटत नव्हतं. टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच न्यूझीलंडला या सामन्यात सुद्धा मात देईल अशी शक्यता होती. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासूनच टीम इंडियाच्या फलंदाजांच्या विकेट घेण्यास सुरुवात केली. मॅट हेनरीने पहिल्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांना भोपळाही फोडू न देता माघारी परतवले. भारताची धावसंख्या ही 3 बाद 2 धावा अशी होती. त्यानंतर अक्षर पटेल, ईशान किशन आणि ऋतुराजने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना फार यश आलं नाही. भारताकडून फलंदाजी करताना ईशान किशनने 27, अक्षर पटेलने 21, नमन धीरने 21 धावा अशी कामगिरी केली. मात्र टीम इंडिया विजयाचं आव्हान पूर्ण करण्यापासून खूपच लांब राहिली. टीम इंडिया 89 धावांवर ऑलआउट झाली आणि न्यूझीलंडचा 244 धावांनी विजय मिळवला. 

हेही वाचा : विराट कोहलीने पकडली फॅन्सची हुशारी, ऑटोग्राफ देण्यास दिला नकार, नेमकं काय झालं? Video व्हायरल

टीम इंडियाची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग

न्यूझीलंड संघाची प्लेईंग 11 :

टिम सायफर्ट (विकेटकिपर), विल यंग, ​​निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिस्टियन क्लार्क, काईल जेमिसन, मॅट हेन्री, मॅथ्यू फिशर

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES