SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IND vs NZ चौथ्या वनडेत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, गंभीर आणि अय्यर कोणाला देणार संधी?

IND VS NZ 4th ODI Playing 11 Prediction : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून यातील चौथा सामना हा 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होणार आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 12, 2026, 13:51 IST | Updated: Nov 12, 2026, 14:30 IST
Image Credit: IND vs NZ चौथ्या वनडेत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, गंभीर आणि अय्यर कोणाला देणार संधी?
Join

IND VS NZ 4th ODI Playing 11 Prediction : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून यातील चौथा सामना हा माउंड माऊंगनुई येथे होणार आहे. सुरुवातीचे दोन सामने भारताने जिंकले तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे, चौथ्या सामन्यात टीम इंडियाच्या संघात काही बदल होणार असून कर्णधार शुभमन गिल सह तीन खेळाडूंच्या जागी प्लेईंग 11 मध्ये कोणते खेळाडू सामील होतात हे पाहून महत्वाचं असणार आहे.

शुभमन गिल, राहुल आणि कंबोजच्या ऐवजी कोण खेळणार?

वनडे सीरिजमधील शेवटच्या दोन सामन्यांत गिल, राहुल आणि कांबोज यांचा समावेश नसण्यामागे आगामी टेस्ट सीरिजची तयारी हे कारण आहे. हे तिन्ही खेळाडू आता भारताच्या टेस्ट सीरिजचा भाग असतील आणि सराव शिबिरात सामील होतील. त्यांच्या अनुपस्थितीत फायनल प्लेईंग 11 मध्ये खेळाडूंच्या संघात कोणते बदल केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी काही अशा खेळाडूंची नावे सुचवली आहेत, ज्यांना संघात स्थान दिले जाऊ शकते.

हेही वाचा : IPL 2027 मध्ये बांगलादेशी खेळाडूंची एंट्री? ऑक्शनपूर्वी BCCI चा मोठा निर्णय

शुभमन गिल हा बाहेर झाल्याने ईशान किशन हा रोहित शर्मा सोबत ओपनिंगसाठी मैदानात येऊ शकतो. ईशान किशन हा दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार सुद्धा आहे. ज्यामुळे तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. माजी क्रिकेटर अंबाती रायडूने मीडियाशी बोलताना असे सुचवले की, गिलच्या जागी इशान किशनने ओपनिंग फलंदाजी करायला हवी. त्याने असेही सुचवले की, केएल राहुलच्या जागी ऋतुराज गायकवाडने मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करावी. माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने सुद्धा मीडियाशी बोलताना सुचवलं की  अंशुल कंबोजच्या जागी यश ठाकूरला संधी देण्यात येऊ शकते.

भारताची प्लेईंग 11 :

 ईशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, नमन धीर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, आकिब नबी

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES