IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा माउंट माउंगानुईच्या बे ओवल मैदानावर होत आहे. टीम इंडियाचा नियमित वनडे कर्णधार शुभमन गिल हा आगामी टेस्ट सीरिजच्या सरावासाठी वनडे संघातून बाहेर पडलाय. त्यामुळे चौथ्या वनडे सामन्यात भारताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करतोय. श्रेयस अय्यर अशा प्रकारे भारताचा 29 वा वनडे कर्णधार बनला असून हा त्याचा वनडे संघाचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. या सामन्याचा टॉस श्रेयसने जिंकला आणि त्याने प्रथम टीम इंडियासाठी गोलंदाजी निवडली. यासह यंदा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये तीन महत्वाचं बदल झालेले आहेत.
प्लेईंग 11 मध्ये 3 मोठे बदल :
शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कांबोज हे तिघे चौथा आणि पाचवा वनडे सामन्यात टीम इंडियाचा भाग असणार नाही. ते आगामी टेस्ट सीरिजच्या सरावासाठी रवाना न्यूझीलंडमधील दुसऱ्या शहरात रवाना झाले आहे. तेव्हा या तिघांच्या जागी ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघात जवळपास एकूण सहा बदल झालेले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने सांगितलं की आम्ही तिसऱ्या क्रमांकावर निक केलीला, चौथ्या क्रमांकावर फॉक्सीला, तसेच फिन ॲलन, ख्रिस्टियन क्लार्क, मायकेल ब्रेसवेल आणि मॅट हेन्री यांचाही समावेश करण्यात आला आहे.
भारताची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टिम सायफर्ट (विकेटकिपर), विल यंग, निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिस्टियन क्लार्क, काईल जेमिसन, मॅट हेन्री, मॅथ्यू फिशर