• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /Explained: चांदीच्या दरात एवढी तेजी का? सोनं नाही, जाणून घ्या AI सह 5 मोठी कारणं

Explained: चांदीच्या दरात एवढी तेजी का? सोनं नाही, जाणून घ्या AI सह 5 मोठी कारणं

एआय आणि डेटा सेंटरमुळे चांदीची मागणी वाढण्याची एक नवी दिशा निर्माण झाली आहे. त्यासोबत सोलर, ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विस्तार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे चांदीच्या बाजाराचे महत्त्व वाढले आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Sep 29, 2026, 09:18 PM IST|Updated: Sep 29, 2026, 09:38 PM IST
joinshare
Explained: चांदीच्या दरात एवढी तेजी का? सोनं नाही, जाणून घ्या AI सह 5 मोठी कारणं
Image Credit: AIचा वापर वाढत असताना जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारले जात आहेत. चॅट जीपीटीसारख्या एआय सेवांपासून क्लाउड कम्प्युटिंगपर्यंत अनेक सेवा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्व्हर, चिप्स, नेटवर्किंग उपकरणे आणि वीजपुरवठा यंत्रणा आवश्यक असते. या इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत उपकरणांमध्ये चांदीचा वापर केला जातो.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चांदीकडे आतापर्यंत प्रामुख्याने दागिने, गुंतवणूक आणि औद्योगिक वापरासाठी पाहिले जात होते. मात्र आता आर्टिफिशिल इंटेलिजन्स  (AI), डेटा सेंटर, सोलर एनर्जी, इलेक्ट्रीक वेकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांमुळे चांदीची औद्योगिक मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीवर पारंपरिक गुंतवणुकीसोबतच तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणीचाही प्रभाव पडत आहे. 2026 मध्ये चांदीच्या बाजारात पुरवठा आणि मागणीतील तफावतही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.

AIच्या वाढीसोबत चांदीची मागणी का वाढतेय?

AIचा वापर वाढत असताना जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारले जात आहेत. चॅट जीपीटीसारख्या एआय सेवांपासून क्लाउड कम्प्युटिंगपर्यंत अनेक सेवा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्व्हर, चिप्स, नेटवर्किंग उपकरणे आणि वीजपुरवठा यंत्रणा आवश्यक असते. या इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत उपकरणांमध्ये चांदीचा वापर केला जातो.चांदी ही विजेची उत्कृष्ट वाहक असल्याने इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स, कनेक्टर्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये तिचा उपयोग होतो. त्यामुळे एआय आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांचा विस्तार झाला की चांदीची औद्योगिक मागणीही वाढण्याची शक्यता आहे. काही विश्लेषणांनुसार डेटा सेंटरमधील चांदीचा वापर हा पूर्वीच्या अंदाजांपेक्षा लक्षणीय मोठा ठरत आहे.

सोलर पॅनल आणि EVमुळेही चांदीचा वापर वाढतोय

चांदीच्या वाढत्या मागणीमागे केवळ AI जबाबदार नाही. सोलर एनर्जी आणि इलेक्टिर वेकल्स हेही मोठे ग्राहक आहेत. सोलर पॅनेलमध्ये वीज वाहून नेण्यासाठी चांदीचा वापर केला जातो. जगभरातील देश स्वच्छ ऊर्जेकडे वळत असल्यामुळे सौरऊर्जेची क्षमता वाढत आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पारंपरिक वाहनांच्या तुलनेत अधिक इलेक्ट्रॉनिक घटक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन असतात. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांमध्येही चांदीचा वापर होतो. त्यामुळे डिजिटलायझेशनसोबतच इलेक्ट्रफिकेशन वाढत असल्याने चांदीला औद्योगिक मागणीचे आणखी एक मोठे क्षेत्र मिळाले आहे.

चांदीचा पुरवठा मात्र मागणीच्या वेगाने वाढतोय का?

चांदीच्या बाजारातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सप्लाय डेफिशिट. म्हणजेच काही वर्षांपासून जागतिक मागणी आणि उपलब्ध पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होत आहे. चांदी ही केवळ मौल्यवान धातू नसून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक धातू म्हणून वापरली जाते. त्यामुळे अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील मागणी वाढली की तिच्या बाजारावर त्याचा परिणाम होतो.

2026 मध्येही चांदीच्या बाजारात पुरवठ्याची घट आणि औद्योगिक मागणी यांचा मेळ महत्त्वाचा ठरत आहे. काही विश्लेषणांनुसार जागतिक चांदी बाजारातील तूट सलग सहाव्या वर्षी कायम राहण्याचा अंदाज आहे.

भारतामध्येही चांदीची मागणी मोठी

भारत हा जगातील मोठ्या चांदी ग्राहकांपैकी एक आहे. येथे चांदीचा वापर दागिने, नाणी, बार, गुंतवणूक आणि औद्योगिक क्षेत्रात होतो. गेल्या काही वर्षांत भारतातील चांदीतील भौतिक गुंतवणूकही वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2016 मध्ये सुमारे 36.5 दशलक्ष औंस असलेली भौतिक गुंतवणूक 2025 मध्ये 79.2 दशलक्ष औंसपर्यंत पोहोचली. भारतामध्ये सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार होत असल्याने भविष्यात औद्योगिक मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र भारत चांदीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. आयातीत बदल झाल्यास देशांतर्गत उपलब्धता आणि प्रीमियमवर परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच चांदीच्या किमतीवर अनेक घटकांचा परिणाम

चांदीच्या दरवाढीमागे फक्त एआय किंवा डेटा सेंटर हे एकमेव कारण नाही. औद्योगिक मागणी, सोलर पॅनेल, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, गुंतवणूकदारांची मागणी, पुरवठ्यातील तूट, डॉलरचा दर, अमेरिकेच्या व्याजदरांबाबतची भूमिका आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या सर्वांचा चांदीच्या किमतीवर परिणाम होतो. चांदी ही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर धातू मानली जाते, कारण तिचा वापर मौल्यवान धातू म्हणून तसेच औद्योगिक धातू म्हणून होतो. त्यामुळे औद्योगिक मागणीत किंवा जागतिक आर्थिक परिस्थितीत बदल झाला तर चांदीच्या दरात तुलनेने मोठी चढ-उतार होऊ शकतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Silver Price
india
Investment News
Business News