• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'तो फोन करताना माझे हात थरथरत होते', कोणत्या नेत्याशी फोनवरून बोलताना सोनिया गांधी एवढ्या घाबरलेल्या? त्यामागचं कारण काय? स्वत: केला खुलासा

'तो फोन करताना माझे हात थरथरत होते', कोणत्या नेत्याशी फोनवरून बोलताना सोनिया गांधी एवढ्या घाबरलेल्या? त्यामागचं कारण काय? स्वत: केला खुलासा

सोनिया गांधी त्यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. नेमकं तेव्हा काय घडलं होतं? त्यांनी हा कॉल कोणाला केला होता? त्या कशामुळे एवढ्या घाबरत होत्या की त्यांचे हात थरथरत होते जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 12, 2026, 12:39 IST|Updated: Nov 12, 2026, 13:07 IST
joinshare
'तो फोन करताना माझे हात थरथरत होते', कोणत्या नेत्याशी फोनवरून बोलताना सोनिया गांधी एवढ्या घाबरलेल्या? त्यामागचं कारण काय? स्वत: केला खुलासा
Image Credit: सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष असताना घडलेला प्रकार (फाइल फोटो, सौजन्य - 'रॉयटर्स'वरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काँग्रेसच्या नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधींचं आत्मचरित्र 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये सोनिया गांधींनी भारतीय राजकारणामधील पडद्यामागील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. 2004 मध्ये कशाप्रकारे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केलं, पडद्यामागे काय काय घडलं इथपासून ते 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक गोष्टींची यापूर्वी कधीही न समोर आलेली बाजू सोनिया यांनी पुस्तकातून मांडली आहे. या पुस्तकात असे अनेक प्रसंग सोनिया गांधींनी नमूद केले आहेत की जे त्यांच्या आयुष्याला आणि एकंदरितच राजकीय जीवनाला वळण देणारे ठरले. असाच एक प्रसंग सांगताना सोनिया गांधींनी एका नेत्याला फोन करताना त्याचे हात थरथरत होते असा उल्लेख केलाय. हा नेता कोण आणि नेमकं तेव्हा झालेलं काय ते पाहूयात...

पक्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाचा किस्सा

1999 ला सत्ता गमावल्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी प्रयत्न करत होत्या तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत भाजपाविरुद्ध काँग्रेससोबतच्या आघाडीत एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्यावेळी द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुक (डीएमके) या दाक्षिणात्य पक्षाला आघाडीत घेण्याचा निर्णय सोनिया गांधी यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण ठरल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. डीएमकेला सोबत घेण्याबद्दल साशंक असण्याचं कारण होतं 1991 मध्ये सोनिया गांधीचे पती आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येशी असलेलं या पक्षाचं विचित्र कनेक्शन!

नक्की वाचा >>
'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'

या साऱ्याचं इतिहाशी काय कनेक्शन?

राजीव गांधींची हत्या करणाऱ्या श्रीलंकेच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम म्हणजेच एलटीटीईला समर्थन करणाऱ्या द्रमुकच्या काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. पतीच्या  हत्येला दीड दशकही पूर्ण झालं नव्हतं त्यापूर्वीच त्यांची हत्या करणाऱ्या गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं सोनिया गांधींना अवघड वाटत होतं.

कोणाला केलेला फोन?

द्रमुकशी हातमिळवणी करणे म्हणजे राजीव गांधी यांच्या बलिदानाची प्रतारणा ठरेल का? असा मोठा नैतिक संभ्रम सोनिया गांधींच्या मनात त्यावेळी होता. मात्र भावनिक राजकारण बाजूला ठेवून प्रॅक्टीकल विचार करत सोनिया गांधींनी भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी अत्यंत जड अंतःकरणाने द्रमुकशी संपर्क साधल्याचं पुस्तकात म्हटलं आहे. थरथरत्या हातांनीच द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधि यांना सोनिया गांधींनी आघाडीसंदर्भातील चर्चेसाठी पहिला फोन लावल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. "करुणानिधिंना फोन केला तेव्हा माझे हात थरथरत होते," असं सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. 

नक्की वाचा >>
मनमोहन सिंग यांना हटवून 2010 मध्ये काँग्रेसच्या 'या' नेत्याला व्हायचं होतं पंतप्रधान, सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा; 'मला धक्का...'

विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची भाषा वेगळी होती तरी आघाडीची मोट बांधण्यासंदर्भातील संवाद प्रक्रिया अत्यंत सौहार्दपूर्ण झाली. पुढे यामधूनच पुढे  संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच 'यूपीए'ची स्थापना झाली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sonia Gandhi
congress