IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील चौथा सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळवला गेला. सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून 2-0 ने सीरिजमध्ये आघाडी मिळवली होती. तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 334 धावांचं टार्गेट मिळालं होतं. मात्र हे आव्हान टीम इंडिया पूर्ण करू शकली नाही आणि 89 धावांवर ऑलआउट झाली. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय झाला असून त्यांनी वनडे सीरिजमध्ये 1-2 ने मजल मारली आहे.
न्यूझीलंडने दिलं 334 धावांचे आव्हान :
टीम इंडियाचा नियमित वनडे कर्णधार शुभमन गिल हा आगामी टेस्ट सीरिजच्या सरावात असल्याने तो न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या आणि पाचव्या सामन्यात टीम इंडियाच्या वनडे संघाचा भाग नाही. त्यामुळे टीम दोन वनडे सामन्यात श्रेयस अय्यर हा भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व करतोय. याआधी कधीच श्रेयसने वनडे संघाचं नेतृत्व केलेलं नव्हतं. टीम इंडियाचा 29 वा वनडे कर्णधार असेल्या श्रेयस अय्यरने चौथ्या सामन्याचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून 333 धावांची खेळी केली. टीम इंडियाला विजयासाठी 334 धावांचे आव्हान दिले. यात न्यूझीलंडकडून विल याँगने सर्वाधिक 125 धावा केल्या. तर टिम सायफर्टने 58 आणि फिन ॲलन 41 धावा केल्या. भारताचे गोलंदाज औकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक 2 विकेट तर अर्शदीप सिंह आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताची फलंदाजी ढासळली :
न्यूझीलंडने भारताला विजयासाठी दिलेलं आव्हान हे भारतीय फलंदाजीच्या दिग्गज फळीसमोर फार मोठं वाटत नव्हतं. टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच न्यूझीलंडला या सामन्यात सुद्धा मात देईल अशी शक्यता होती. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासूनच टीम इंडियाच्या फलंदाजांच्या विकेट घेण्यास सुरुवात केली. मॅट हेनरीने पहिल्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांना भोपळाही फोडू न देता माघारी परतवले. भारताची धावसंख्या ही 3 बाद 2 धावा अशी होती. त्यानंतर अक्षर पटेल, ईशान किशन आणि ऋतुराजने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना फार यश आलं नाही. भारताकडून फलंदाजी करताना ईशान किशनने 27, अक्षर पटेलने 21, नमन धीरने 21 धावा अशी कामगिरी केली. मात्र टीम इंडिया विजयाचं आव्हान पूर्ण करण्यापासून खूपच लांब राहिली. टीम इंडिया 89 धावांवर ऑलआउट झाली आणि न्यूझीलंडचा 244 धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा : विराट कोहलीने पकडली फॅन्सची हुशारी, ऑटोग्राफ देण्यास दिला नकार, नेमकं काय झालं? Video व्हायरल
टीम इंडियाची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग
न्यूझीलंड संघाची प्लेईंग 11 :
टिम सायफर्ट (विकेटकिपर), विल यंग, निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिस्टियन क्लार्क, काईल जेमिसन, मॅट हेन्री, मॅथ्यू फिशर