IND VS NZ 4th ODI Playing 11 Prediction : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून यातील चौथा सामना हा माउंड माऊंगनुई येथे होणार आहे. सुरुवातीचे दोन सामने भारताने जिंकले तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे, चौथ्या सामन्यात टीम इंडियाच्या संघात काही बदल होणार असून कर्णधार शुभमन गिल सह तीन खेळाडूंच्या जागी प्लेईंग 11 मध्ये कोणते खेळाडू सामील होतात हे पाहून महत्वाचं असणार आहे.
शुभमन गिल, राहुल आणि कंबोजच्या ऐवजी कोण खेळणार?
वनडे सीरिजमधील शेवटच्या दोन सामन्यांत गिल, राहुल आणि कांबोज यांचा समावेश नसण्यामागे आगामी टेस्ट सीरिजची तयारी हे कारण आहे. हे तिन्ही खेळाडू आता भारताच्या टेस्ट सीरिजचा भाग असतील आणि सराव शिबिरात सामील होतील. त्यांच्या अनुपस्थितीत फायनल प्लेईंग 11 मध्ये खेळाडूंच्या संघात कोणते बदल केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी काही अशा खेळाडूंची नावे सुचवली आहेत, ज्यांना संघात स्थान दिले जाऊ शकते.
शुभमन गिल हा बाहेर झाल्याने ईशान किशन हा रोहित शर्मा सोबत ओपनिंगसाठी मैदानात येऊ शकतो. ईशान किशन हा दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार सुद्धा आहे. ज्यामुळे तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. माजी क्रिकेटर अंबाती रायडूने मीडियाशी बोलताना असे सुचवले की, गिलच्या जागी इशान किशनने ओपनिंग फलंदाजी करायला हवी. त्याने असेही सुचवले की, केएल राहुलच्या जागी ऋतुराज गायकवाडने मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करावी. माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने सुद्धा मीडियाशी बोलताना सुचवलं की अंशुल कंबोजच्या जागी यश ठाकूरला संधी देण्यात येऊ शकते.
भारताची प्लेईंग 11 :
ईशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, नमन धीर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, आकिब नबी