• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /स्वप्निल घंगाळे

Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे

मोजक्या शब्दांमध्ये...

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

पत्रकारितेचा श्रीगणेशा

स्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.

डिजिटलमध्ये एन्ट्री

'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.

प्रगल्भतेची आस

महाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.

तो सध्या काय करतो?

'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

स्वप्निल घंगाळे Articles

आधी स्वत: गुटखा खा, तुमच्या मुलांना सवय लावा आणि मग...; तुकाराम मुंढेंनी सेलिब्रिटींना थेट सुनावलं

आधी स्वत: गुटखा खा, तुमच्या मुलांना सवय लावा आणि मग...; तुकाराम मुंढेंनी सेलिब्रिटींना थेट सुनावलं

Tukaram Mundhe30 Sept 2026, 9:26 am IST
NCMC हेल्पलाइनवर एसटी महामंडळाने मराठी भाषेला डावलले! केवळ हिंदी आणि इंग्रजीचाच पर्याय; ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ

NCMC हेल्पलाइनवर एसटी महामंडळाने मराठी भाषेला डावलले! केवळ हिंदी आणि इंग्रजीचाच पर्याय; ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ

Maharashtra News30 Sept 2026, 8:25 am IST
मुंबईसहीत महाराष्ट्रातील 3 प्रमुख शहरांमध्ये घरांच्या मागणीत घट!  एकाच शहरात विक्री जोरात, नाव वाचून बसेल धक्का

मुंबईसहीत महाराष्ट्रातील 3 प्रमुख शहरांमध्ये घरांच्या मागणीत घट! एकाच शहरात विक्री जोरात, नाव वाचून बसेल धक्का

Mumbai News29 Sept 2026, 3:21 pm IST
मुंबईमध्ये परदेशी स्टाइलचं मत्स्यालय... काचेच्या बोगद्यातून चालत पाहता येणार जलचर; कधी, कुठे सुरु होणार हे मत्स्यालय?

मुंबईमध्ये परदेशी स्टाइलचं मत्स्यालय... काचेच्या बोगद्यातून चालत पाहता येणार जलचर; कधी, कुठे सुरु होणार हे मत्स्यालय?

Mumbai29 Sept 2026, 2:04 pm IST
एकाच ट्रीपमध्ये समुद्र, किल्ले अन् जंगल सफारी, राज्य सरकारचं नवं पर्यटन धोरण; तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार जाणून घ्या

एकाच ट्रीपमध्ये समुद्र, किल्ले अन् जंगल सफारी, राज्य सरकारचं नवं पर्यटन धोरण; तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार जाणून घ्या

Maharashtra Tourism29 Sept 2026, 2:05 pm IST
  • Previous
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

2

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

3

महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?

4

मीनाक्षी - राजेंद्र शिंदेंची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज...; अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले, 'पुराव्याची सांगड घालून...' प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

5

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.