नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू होणार आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळणार आहेत; समृद्धी, मुंबई-पुणे द्रुतगती आणि मुंबई-गोवा महामार्गांवर विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी सहकार मंत्र्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३.५० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
अंबरनाथमध्ये नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाला आहे. बाळाचं अपहरण केल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. बाळ चोरी प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
मुंबईत 2002 मध्ये एक मुलगी आपल्या कुटुंबापासून दुरावली. तिचा कुटुंबातील सदस्यांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. पण तब्बल 24 वर्षांनी मतदानातील यादीमुळे तिचा शोध लागला.
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू झाला असून संपूर्ण राज्यातून मोसमी पाऊस माघारी गेला आहे.
लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून मुलाची आईला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर वातावरणात बदल जाणवतो. पण हा बदल नेमका काय असतो? जाणून घ्या ऑक्टोबर हिट म्हणजे काय?
एकमेकांच्या पायाला लोखंडी साखळी बांधून एका दाप्त्याने तापी नदीत आत्महत्या केली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावरुन उडी घेतली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा उत्पादनाची चिंता जाणवू लागली आहे.
Amol Mitkari On Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील डोणजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडच्या दिग्गजांची अनुपस्थिती होती, ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली.
डोंबिवलीत विवाहितेला ब्लॅकमेल करण्यात आले. 70 हून अधिक व्हिडिओ काढून तिला संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उष्णता वाढू लागली आहे. विदर्भात पारा 39 अंशावर पोहोचला आहे.
आगामी काळात एआय, मोठ्या प्रमाणातील डेटा प्रक्रिया आणि उच्च कार्यक्षम संगणकीय तंत्रज्ञानाची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्रात 500 मेगावॉट क्षमतेचा ग्रीन इंटिग्रेटेड हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप घेतली आहे. पहिल्या आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये घोटाळा उघडकीस आला आहे. नियमबाह्य पास वाटपप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
बुलढाण्यात पोलीस ठाण्याच्या दारातच तलवारींचा थरार पहायला मिळाला. दोन गटात राडा झाला. तलावारीने हल्ला करण्यात आला. यात शिवसनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. 7 जण जखमी झाले आहेत.
पत्नीने पतीचा खून करून हृदयविकाराचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी हा हत्याचे डाव उघडकीस आणला. पत्नीच्या प्रियकरासह चौघांना अटक झाली आहे.